बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळेच, विशेषतः हिवाळ्यात लोक बदामांना आहाराचा भाग बनवतात. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. हे फक्त शरीराचा विकास करण्यासाठीच मदत करत नाहीत, तर शरीर तंदुरुस्त देखील करतात. परंतु काही वेळा बदाम खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरीरात काही अशा समस्या असतात ज्यामुळे बदाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी अधिक हानी पोहोचवू शकतात. तर जाणून घेऊया बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी कधी हानिकारक ठरू शकते.

ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

उच्च रक्तदाबाचा त्रास

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी बदामाचे सेवन करू नये. उच्च रक्तदाबाचे रुग्ण बीपी नियंत्रित करण्यासाठी काही औषधे घेतात. अशा परिस्थितीत बदाम खाणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मूत्रपिंडाची समस्या

मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांनीसुद्धा बदामाचे सेवन करू नये. बदामामध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे त्यांची ही समस्या वाढू शकते. त्यामुळे ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा पित्ताशयात खडे असण्याची समस्या आहे, त्यांनी बदाम खाणे टाळावे.

पचनाची समस्या

पचनाची समस्या असणाऱ्या लोकांनी बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे बदाम पचायला त्रास होऊ शकतो.

Health Tips : निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांच्या ‘या’ सवयी फायद्याच्या; जाणून घ्या काय असतं आहारात

अ‍ॅसिडिटीची समस्या

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीची समस्या असते त्यांनी बदाम खाऊ नये. बदामामध्ये फायबरची मात्र अधिक असते, ज्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या जाणवू शकते.

वाढत्या वजनाची समस्या

जर तुमचे वजन खूप वाढले आहे आणि तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बदामाचे सेवन करू नये. बदामामध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असते. यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते.