मुलींच्या मेकअप किटमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक महागडे प्रोडक्ट मिळतील. तसेच लिपस्टिक हे मेकअप मधलं सर्वात महत्वाचे ब्युटी प्रॉडक्ट आहे. लिपस्टीकमुळे ओठचं नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलते. यामुळे महिलांच्या पर्समध्ये लिपस्टीक असतेच. त्यातच आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टीक मिळत आहेत. यात न्यूड, वेलवेट, लिक्विडही लिपस्टीक आल्या आहेत. मुलींचे सौंदर्य वाढवण्यात मेकअप उत्पादनांचा महत्त्वाचा वाटा असतो. मेकअप किटमध्ये अशी अनेक उत्पादने आहेत, जी वर्षानुवर्षे वापरली जात नाहीत.
जुन्या लिपस्टिकमुळे ओठांचे नुकसान होऊ शकते
तुम्हाला माहीत आहे का की औषधांप्रमाणेच मेकअप प्रोडक्ट्सची देखील एक्स्पायरी डेट असते, त्यानंतर ही उत्पादने वापरणे त्वचेसाठी हानिकारक असते? या उत्पादनांमध्ये, महिलांच्या आवडत्या लिपस्टिकबद्दल जाऊन घेणार आहोत.
खराब व जुनी लिपस्टिक कशी ओळखायची
लिपस्टिक मुलींचे सौंदर्य वाढवते यात शंका नाही. मुलींच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक अनिवार्य असते. लिपस्टिकवर एक्स्पायरी डेट लिहिलेली नसते हेही तुमच्या लक्षात आले असेल. पण याचा अर्थ असा नाही की लिपस्टिक कधीही खराब होत नाही. अशाच काही पद्धती, ज्याच्या मदतीने तुम्ही लिपस्टिकची एक्सपायरी डेट ओळखू शकता.
२ वर्षे जुनी लिपस्टिक वापरू नका
लिपस्टिकशिवाय मुलींचा लूक पूर्ण होत नाही. त्यात काही मुली मेकअप करत नसले तरी लिपस्टिक लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. सर्व लिपस्टिकचे शेल्फ लाइफ २ वर्ष असते. जर तुमची लिपस्टिक २ वर्षांपासून वापरली गेली असेल तर ती अजिबात वापरू नका. एक्सपायर झालेली लिपस्टिक वापरल्याने तुमचे ओठ जळू शकतात आणि सूज येऊ शकतात.
विचित्र वास येत असल्यास लिपस्टिक वापरू नका
लिपस्टिकला खूप छान वास येतो, पण जर तुमच्या लिपस्टिकमधून विचित्र वास येऊ लागला तर याचा अर्थ लिपस्टिक एक्सपायर झाली आहे. अशा परिस्थितीत एक्सपायर झालेली लिपस्टिक वापरणे टाळा. एक्सपायर झालेली लिपस्टिक तुमच्या ओठांच्या जळण्यासोबतच तोंडात गेल्यास शरीराला खूप नुकसान होऊ शकते.
लिपस्टिकवरील ओलावा हे एक्स्पायरीचे लक्षण आहे
जेव्हा लिपस्टिकवर मॉइश्चरायझरचे थेंब दिसले, तेव्हा समजून घ्या की लिपस्टिक खराब झाली आहे. एक्सपायर झालेली लिपस्टिक वापरू नका.
लिपस्टिक ओठांवर नीट न लागणे
एक्सपायर झालेली लिपस्टिक ओळखण्याचा आणखी एक मार्ग आहे. जेव्हा तुमची लिपस्टिक ओठांवर सहज चिकटत नाही किंवा ओठांवर पॅच दिसतात, तेव्हा याचा अर्थ लिपस्टिक एक्सपायर झाली आहे. याशिवाय जर लिपस्टिक चिकट आणि खडबडीत होऊ लागली तर लगेच समजून घ्या की ही लिपस्टिक आता वापरण्यायोग्य नाही.