Perfect Eyebrow Shape for Your Face : प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या आकारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आयब्रो शेप छान दिसतात. काहींना जाड आयब्रो शेप आवडतो, तर काहींना पातळ आयब्रो शेप आवडतो. पण, तुमच्या चेहऱ्यानुसार जर तुम्ही आयब्रो शेप ठेवला नाही तर लूक खराब किंवा विचित्र दिसतो, त्यामुळे आयब्रोला योग्य शेप देणं फार गरजेचं आहे. यासाठी तुम्ही चेहऱ्याच्या आकारानुसार कोणता शेप चांगला दिसेल हे ठरवा. तुम्हालाही तुमच्या आयब्रोला परफेक्ट शेप द्यायचा असेल तर ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील; या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ…
चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो शेप
१) लांब चेहऱ्यासाठी
जर तुमचा चेहरा लांब असेल तर सरळ आणि लांब भुवया तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा आकार ऑप्टिकली तुमच्या चेहऱ्याची लांबी कमी करतो, ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक संतुलित आणि आकर्षक दिसू लागतो.
२) गोलाकार चेहऱ्यासाठी
तुमचा चेहरा गोल असेल तर किंचित उंच आणि वी शेप आयब्रो तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. या प्रकारच्या आयब्रोमुळे तुमचा चेहरा लांब आणि अरुंद दिसतो, ज्यामुळे गोल चेहऱ्याची रुंदी कमी होण्यास मदत होते. हे केवळ तुमच्या चेहऱ्याला अधिक संतुलित लूक देत नाही तर तुमचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही थ्रेडिंगसाठी जाल तेव्हा वी शेप जाड आयब्रो ठेवण्यास सांगा, यामुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.
३) अंडाकृती चेहऱ्यासाठी
अंडाकृती चेहरे हा आदर्श चेहरा मानला जातो, परंतु त्यावर सर्व प्रकारचे आयब्रो शेप सुंदर दिसतात. तुम्ही सरळ, वी आकारात किंवा गोलाकार कोणत्याही शेपमध्ये आयब्रो ठेवलात तरी प्रत्येक शेप तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते.
४) चौकोनी चेहऱ्यांसाठी
चौकोनी चेहऱ्याच्या लोकांचे कपाळ रुंद असते. अशा चेहऱ्यावर गोल किंवा वी शेप आयब्रो छान दिसतात. अशाप्रकारे आयब्रो केल्यास चेहरा एकदम आकर्षक दिसतो. वी किंवा गोलाकार आयब्रो शेप चेहऱ्याचा कठोरपणा कमी करतात, अशाने चेहऱ्यावर संतुलित, गोड हसू दिसते; ज्यामुळे तुमचा संपूर्ण लूक अधिक सुंदर दिसतो.