डोळे हा शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहे. आपण घराबाहेर पडल्यानंतर धुळ, प्रदूषण यांमुळे डोळ्यांना लगेच इन्फेकशन होण्याची शक्यता असते. ज्यांचे डोळे संवेदनशील आहेत त्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. डोळ्यांना सीजनल इन्फेकशन किंवा काही औषधांचे रिएक्शन देखील होऊ शकते. अशामध्ये डोळ्यांची काळजी नेमकी कशी घ्यायची हे अनेकांना माहित नसते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामानातील बदलामुळे होणारे इन्फेकशन
हवामानात बदल झाल्याने काहीजणांना डोळ्यांचे इन्फेक्शन होते. ज्यांचे डोळे सेंसिटिव्ह आहेत त्यांना याचा त्रास हवामान बदलल्यावर लगेच होतो. थंडीच्या वातावरणात सर्दी झाल्यानंतर डोळे सुजणे, डोळ्यांना खाज येण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास देखील हे होऊ शकते.

या इन्फेकशन पासून वाचण्यासाठी करा हे उपाय

  • नाक आणि तोंडावर मास्क लावा.
  • प्रदूषण वाढल्याने हवा दूषित असेल तर बाहेर जाणे टाळा.
  • घरातील खिडक्या बंद ठेवा, तसेच प्रवास करताना गाडीच्या खिडक्या बंद ठेवा.

आणखी वाचा : Low Blood Pressure ठरू शकते आरोग्यासाठी घातक; यावर कोणते उपाय ठरतात फायदेशीर जाणून घ्या

पेरेनियल ॲलर्जी
काही ॲलर्जी या वर्षभराच्या कालावधीसाठी असतात, त्यांना पेरेनियल ॲलर्जी म्हणतात. ही ॲलर्जी धुळीमुळे किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे होऊ शकते. ॲलर्जीपासून वाचण्यासाठी ॲलर्जीचे कारण शोधा आणि त्यावरून त्याचा उपचार करा किंवा ते टाळता येईल यासाठी प्रयत्न करा. तसेच असे इन्फेकशन झाल्यास त्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरडे डोळे
डोळे कोरडे होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. डोळे कोरडे होण्यामागे डिहायड्रेशन, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर हे कारण असू शकत. डोळे कोरडे झाल्यानंतर त्यांना खाज येण्याची शक्यता असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या, तसेच स्क्रिन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा. जास्त त्रास होत असल्यास यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्याक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye care use these tips to avoid from allergy pns