Eye Flu Conjunctivitis Treatment: बदलत्या ऋतूमुळे मागील काही दिवसात डोळ्यांची साथ आली आहे. अनेकांना डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे असे त्रास होत आहेत. याला बोलीभाषेत डोळा येणे असं म्हणतात. वैज्ञानिक भाषेत ‘कंजक्टिव्हायटीज’ व वैद्यकीय भाषेत ‘आय फ्लू’ असेही म्हणतात. यात विषाणूंमुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह जाणवतो, ज्यामुळे क्षणिक दृष्टी कमी होऊ शकते. आज आपण डोळ्यांच्या फ्लूची कारणे, चिन्हे आणि उपचारांबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोळा फ्लू कारणे (Eye Flu Reasons)

  • डोळ्यांचा फ्ल्यू हा मुळात संसर्गजन्य आजार आहे. डोळ्यात धूळ, परागकण किंवा रसायनचा अंश गेल्यास फ्लू वाढू शकतो.
  • चुकीच्या पद्धतीने कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने किंवा दीर्घ कालावधीसाठी लेन्स वापरल्याने संसर्ग होऊ शकतो.
  • क्लॅमिडीया किंवा गोनोरिया सारखा लैंगिक संक्रमित संसर्ग असल्यास त्या महिलेच्या नवजात बाळाला डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

डोळ्याच्या फ्लूचे प्रकार

बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटीज:

एखाद्या जीवनामुळे होणारा संसर्ग हा बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटीज असे म्हणतात. यामध्ये डोळा गुलाबी ते हलका लाल दिसू लागतो. यामुळे डोळ्याचा दाह होऊ शकतो. अशा प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग हा अन्य धोक्यांशी सुद्धा संबंधित आहे कारण हे विषाणू जोडीने गोवर, फ्लू किंवा सामान्य सर्दी यांसारखे सामान्य विषाणू वाहून अप्पर रेस्पीरेटरी रोगांची शक्यता वाढवू शकतात.

गोनोकोकल आणि क्लॅमिडीयल कंजक्टिव्हायटीज:

हा संसर्ग मुख्यतः लैंगिक संक्रमित रोगांमुळे होणारा संसर्ग आहे. जेव्हा नवजात अर्भकाला संक्रमित आईमुळे हा त्रास होऊ शकतो.

ऍलर्जिक कंजक्टिव्हायटीज:

पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे, धुळीमुळे किंवा परागकणांमुळे या प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

जायंट पॅपिलरी कंजक्टिव्हायटीज:

सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स परिधान करणार्‍यांना हा त्रास होऊ शकतो. यामुळे दोन्ही डोळ्यांमध्ये खाज सुटणे, घट्ट स्त्राव होणे, अश्रू आणि पापण्यांच्या तळाशी लाल गुठळ्या दिसून येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डोळ्याच्या फ्लूची सामान्य लक्षणे (Eye Flu Common Signs)

  • डोळा लाल होणे, सूज येणे आणि खाज सुटणे. डोळ्यातून सतत पाणी येणे.
  • डोळे प्रकाशास संवेदनशील होऊ शकतात किंवा दृष्टी अंधुक होऊ शकते.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुबळ्यांमध्ये दाह जाणवून येणे.
  • तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

जेव्हा तुम्हाला डोळ्याच्या फ्लूची लक्षणे दिसतात, तेव्हा योग्य स्वच्छता पाळणे महत्त्वाचे असते. आपले हात स्वच्छ ठेवा आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. टॉवेल किंवा उशा यांसारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसह शेअर करणे टाळा.

डोळ्याच्या फ्लू वर उपचार (Eye Flu Treatment)

तुम्ही त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन संबंधित आय ड्रॉप्स वेळोवेळी घ्यायला हवेत जेणेकरून डोळ्यांच्या कोरडेपणामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.

१) डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
२) एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
३) चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
४) ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
५) कोमट पाण्यात भिजवून पिळून घेतलेला मऊसूत कापडाचा बोळा डोळ्यावर ठेवावा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व सामान्य ज्ञानावर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye flu conjunctivitis treatment what cause dola yene red eyes burning and itching puss in eyes check home remedies and signs svs