आपण प्रत्येक जण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत असतो. तसेच आपल्या शरीरातीच सर्वच अवयव हे महत्वाचे असतात मात्र काही अवयवांची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यामध्ये डोळे हा एक सर्वात महत्वाचा अवयव आहे. डोळा आपल्या शरीराचा एक नाजूक भाग आहे. याच्या मदतीने आपल्याला सगळ्या गोष्टी पाहणे शक्य होते. जर काय आपल्याला डोळेच नसले तर आपण हे जग पाहूच शकणार नाही किंवा अनुभवू शकणार नाही. यासाठी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे अतिशय आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी कधी अशा काही घटना घडतात की आपल्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. तसेच वाढत्या वयाबरोबर डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. मात्र आजच्या काळातल्या आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयींमुळे तसेच अन्य कही गोष्टींमुळे अनेकांना चष्मा देखील लागला आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषणयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे आज आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी किंवा त्याचे संरक्षण कसे करावे याबाबतचे काही सोपे उपाय पाहणार आहोत. याबाबतचे वृत्त news18.com ने दिले आहे.

हेही वाचा : Xiaomi चा धमाका; ‘या’ सिरीजमधील स्मार्टफोनच्या तब्बल ३ लाख युनिट्सची केली विक्री, किंमत…

पौष्टिक अन्नाचे सेवन करावे

वेबएमडीमध्ये आलेल्या एका बातमीनुसार, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासाठी ल्युटीन, झिंक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचे सेवन करावे. यासाठी हिरव्या पालेभाज्या, पालक, गाजर, काळे, काजू, संत्री, डाळिंब यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही सॅल्मन फिश, अंडी, टूना फिश खाऊ शकता.

चष्मा लावावा

जर का तुम्ही उन्हामध्ये काम करत असाल किंवा प्रवास करत असाल तसेच उन्हात बाहेर जात असाल तर यावेळी डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. सूर्यप्रकाश, धूळ इत्यादींपासून संरक्षण होण्यासाठी चष्मा लावावा.सन ग्लासेस तुमचे डोळे बाहेरील बॅक्टेरियापासून सुरक्षित ठेवतात.

धूम्रपान टाळावे

जर का तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर तुमच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. धूम्रपान हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. धुम्रपानामुळे तुमच्या नसा खराब होऊ शकतात। म्हणूनच डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही धूम्रपान सोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?

कोणत्याही खेळात किंवा इतर कुठेही डोळ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या. यासाठी तुम्ही जर का क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळताना हेल्मेट घालावे. तसेच बाईक चालवताना हेल्मेट घालावे.

कॉम्प्युटरच्या स्क्रीनपासून दूर राहा

हल्ली प्रत्येकाचे काम हे लॅपटॉप, मोबाइल आणि कॉम्प्युटरवर सुरू असते. आपण सलग ९ ते १० तास त्या स्क्रीनसमोर काम करत असतो. त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. स्क्रीनच्या लाइटमुळे डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. त्यामुळे दृष्टी हळूहळू कमी शकते. म्हणूनच तुम्ही कमीत कमी कॉम्प्युटरसमोर बसून काम केले पाहिजे, तसेच तुम्ही जास्त वेळ काम करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चष्मा नक्कीच वापरणे फायदेशीर ठरू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye protection sun glass eat nutritious foods for vitamins no smoking computer screen 5 health tips tmb 01