उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या कोणत्या रुग्णांना पक्षाघाताचा धोका आहे, हे आता त्यांच्या दृष्टीपटलावरूनही सांगता येणार आहे. सिंगापूरमधील संशोधकांनी हा नवा शोध लावला आहे.
दृष्टीपटलाची विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून चाचणी करून कोणत्या रुग्णाला पक्षाघाताचा जास्त धोका आहे, हे आधीच सांगता येऊ शकते. हे तंत्रज्ञान अतिशय स्वस्त असून, त्यामध्ये रुग्णाच्या शरीरावर कोणताही छेद देण्याची गरज पडणार नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल हायपरटेंन्शनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
दृष्टीपटलाच्या माध्यमातून मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या स्थितीबद्दल माहिती मिळते, असे सिंगापूर दृष्टी संशोधन संस्थेचे सहायक प्राध्यापक आणि या संशोधनाचे नेतृत्त्व करणारे मोहंमद कामरान इकराम यांनी सांगितले. दृष्टीपटलातील रक्तवाहिन्यांची माहितीही विशिष्ट यंत्राच्या साह्याने चाचणी केल्यावर मिळू शकते, असेही इकराम म्हणाले.
जगभरात सध्या उच्च रक्तदाब हाच पक्षाघातासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे दिसते आहे. मात्र, तरीही उच्च रक्तदाब असलेल्या कोणत्या रुग्णांना पक्षाघाताच धोका जास्त आहे, हे सांगणारे कोणतेच संशोधन याआधी झाले नव्हते. या संशोधनामध्ये संशोधकांनी उच्च रक्तदाब असलेल्या आणि यापूर्वी कधीही पक्षाघात न झालेल्या २९०७ रुग्णांची पाहणी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा