प्रत्येकाला आपला चेहरा हा सुंदर दिसावा असं वाटतं असते, त्यामुळे जर चेहऱ्यावर काही डाग किंवा पिंपल्स आले तर ते अनेकांना नकोसं वाटतं. शिवाय चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे उपचारही करतो. पण बाहेरील उपचार खूप महागडे असल्याने ते सतत करता येत नाहीत. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स घालवू शकता..
चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येऊ लागले तर नंतर ते काळ्या डागांमध्ये रुपांतरीत होतात, ज्याचा चेहऱ्याच्या सौंदर्यावर खूप वाईट परिणाम होतो. पण आता तुम्हाला या डागांच्या समस्येला सामोर जाण्याची गरज भासणार नाही. कारण जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल केला तरी तुम्ही पिंपल्सच्या समस्येवर लवकरच मात करु शकता.
अँटी पिंपल्स ड्रिंक्स –
चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्ससाठी तुम्ही अँटी पिंपल्स ड्रिंक्स पिऊ शकता. या ड्रिंक्स रोज पिल्याने पिंपल्स, डाग आणि मुरुम यासारख्या समस्यांपासून लवकरच आराम मिळू शकतो.
ग्रीन टी आणि लिंबू –
ग्रीन टी अनेकदा वजन कमी करण्याचा उपाय असल्याचं मानलं जातं, पण जर तुम्ही लिंबू घालून ग्रीन टी प्यायला तर ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टी तयार केल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून प्या. ग्रीन टीमध्ये असलेले ऑक्सिडंट्स आणि लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला स्वच्छ करतात, ज्यामुळे पिंपल्स लवकर निघून जाण्यास मदत होते.
हेही वाचा- तुमच्या जीवनातील ‘या’ ५ सवयी डायबिटीजचा धोका सहज दूर करु शकतात, कसं ते जाणून घ्या
कडुलिंब आणि मध –
कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपणाला माहिती आहेतच. या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. कडुनिंबाच्या पानांपासून तुम्ही अँटी-बॅक्टेरियल ड्रिंक तयार करू शकता आणि जर तुम्ही ते प्याल तर मुरुम नैसर्गिकरित्या नाहीसे होऊ लागतात. कडुलिंब खूप कडू असल्याने पेयात थोडा मध टाकून पिऊ शकता.
आवळा आणि आले –
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण आवळा वापरतो, पण त्यात असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुरुमांमुळे होणारे जंतू काढून टाकण्यास मदत करतात. आवळ्याचा रस आणि आले एकत्र करून प्यायल्यास डाग तर दूर होतातच शिवाय त्वचेला चांगला ग्लोही येतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)