Face cleaning tips: भारतामध्ये प्रखर उन्हाळा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आपल्यासमोर आहे. मागील एक-दोन आठवड्यांपासून दुपारी उन्हाच्या कडक झळा बसायला सुरुवात झाली आहे. या काळामध्ये शरीरात पाण्याची कमतरता भासायला लागते. परिणामी डिहायड्रेशनसारख्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. उन्हाळ्यामध्ये त्वचेचे देखील नुकसान होते. कोरडी त्वचा, पिंपल्स, सनबर्न अशा समस्या उद्भवतात. अशा वेळी स्कीन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक असते. स्कीन केअर रुटीनबद्दल माहिती देताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गीतिका मित्तल-गुप्ता यांनी काही सोप्या ट्रिक्स सांगतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. गीतिका यांनी चेहऱ्याची निगा राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा चेहरा धुण्याची सवय लावून घ्यायला हवी असे सांगितले. रात्री झोपल्यावर चेहऱ्यावर तेल जमा होते. तेव्हा चेहरा साफ करणे आवश्यक असते. दिवसभर घाम, धूळ, प्रदूषण यांच्याचा थर चेहऱ्यावर येऊ शकतो. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने तो थर निघून जातो. रात्री चेहरा धुण्याआधी मेकअप देखील काढून टाकावा. या सोप्या सवयींचा समावेश स्कीन केअर रुटीनमध्ये केल्याने खूप फायदा होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

चेहरा धुताना फॉलो करायच्या टिप्स:

  • चेहरा स्वच्छ करताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा.
  • बोटांच्या सहाय्याने क्लिंझर हळूवारपणे चेहऱ्याला लावा.
  • सकाळी एकदा आणि रात्री एकदा चेहरा धुवायला विसरु नका.
  • घाण निघून जाण्यासाठी चेहरा किमान ६० सेकंदांसाठी धुणे आवश्यक असते.
  • चेहरा धुतल्यानंतर मऊ टॉवेलने चेहरा हळूहळू पुसावा.
  • सौम्य, पीएच लेव्हल संतुलित असलेल्या आणि स्कीन टाइपला योग्य असणाऱ्या क्लिंझरचा वापर करावा.
  • नियमितपणे योग्य प्रमाणात टोनर, सीरम, मॉइश्चरायझर, रेटिनॉल आणि सनस्क्रीन वापरा.

आणखी वाचा – उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने नक्की होईल फायदा

चेहऱ्याची त्वचा ही खूप संवेदनशील आणि नाजूक असते. त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्याची निगा राखणे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Face cleaning tips for better skin health summer season know more yps
Show comments