फेसबुकसारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा सध्या अनेकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र या साईटवर आपली माहिती सुरक्षित आहे की नाही याबाबतची माहिती अनेकांना नसते. पण फेसबुकवरुन माहिती लीक होत असल्याचे केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणावरुन समोर आले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा फेसबुककडून युजर्सची खासगी माहिती लीक होत असल्याचे समोर आले आहे. फेसबुककडून यूझर्सची खासगी माहिती मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांना दिली जात असल्याचे समोर आले आहे. यात युजर्सच्या खासगी माहितीबरोबरच त्यांचे खासगी संदेश आणि त्यांच्या मित्रांच्या संपर्काच्या माहितीचाही समावेश आहे. आतापर्यंत फेसबुककडून अशा पद्धतीने माहिती लीक केल्याच्या गोष्टी नाकारल्या जात होत्या. मात्र तसे नसून फेसबुककडून माहिती लीक होत असल्याचे समजले आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुककडून नेटफ्लिक्स, स्पॉटीफाय यांसारख्या कंपन्यांना यूझर्सचे खासगी संदेश वाचण्याची सुविधा दिली जात आहे. इतकेच नाही तर युजर्सच्या मित्रांचे संदेशही पाहण्याची सोय मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन असलेल्या बिंगला मिळाली आहे. ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणामध्ये ८.७ कोटी यूझर्सची वैयक्तिक माहिती परस्पर वापरण्यात आली होती. फेसबुककडून माहिती देण्यात येत असलेल्या कंपन्यांमध्ये ऑनलाइन रिटेल व मनोरंजन कंपन्यांचा समावेश आहे. आपली माहिती कोणालाही मिळणार नाही, यासाठी युजर त्यावर नियंत्रण ठेऊ शकतो असे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने सांगितले होते.

Story img Loader