फेसबुक हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया माध्यम आहे. एकमेकांशी चॅटींग करण्याबरोबरच फोटो, व्हिडियो आणि मनातील विचार शेअर करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यात येतो. एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी या अॅप्लिकेशनचा वापर करणे ठिक आहे. पण अनेकजण विनाकारण यावर बराच वेळ घालवतात. मात्र अशाप्रकारे तुमचा जास्त वेळ सोशल मीडियावर जात असेल तर त्यावर तुम्ही आता लगाम लावू शकता. ‘युअर टाईम ऑन फेसबुक’ यामध्ये तुम्ही किती वेळ घालवत आहात हे समजू शकणार आहे. त्यानुसार तुम्ही विनाकारण वाया जात असलेला वेळ वाचवू शकणार आहात.
याबरोबरच अॅपकडून एक टाइम लिमिटही घालून दिले जाणार आहे. त्यामुळे युजर्स एका ठराविक वेळेपर्यंतच फेसबुकचा वापर करु शकणार आहे. ठरावीक वेळ संपली की युजर्सच्या स्क्रिनवर अलर्ट येतील. यामुळे मर्यादेपेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर घालवून होणारा वेळेचा अपव्यय युजर्सना टाळता येणार आहे. तसेच अॅक्टीव्हीटी ग्राफबारमुळे प्रत्येक दिवशी आपण किती वेळ या ठिकाणी सक्रीय होतो याचीही माहिती त्यांना मिळणार आहे. ही सुविधा इन्स्टाग्रामसाठीही उपलब्ध आहे. ज्यांना फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे त्यांच्यासाठी हे फिचर एक उत्तम पर्याय आहे.