फेसबुकने आपला नवा लोगो लाँच केला आहे. कंपनीने हा लोगो एका खास उद्देशाने तयार केला आहे. या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्रजी अक्षरं कॅपिटलमध्ये आहेत. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून हे रंग इंस्टाग्राम किंवा व्हॉट्स अॅपसारख्या फेसबुकचे इतर प्रोडक्ट दर्शवतात.  नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा नवीन लोगो फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी लाँच करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  फेसबुकचे मुख्य विपणन अधिकारी एंटोनियो लुसियो यांनी याबाबत माहिती देताना, युजर्सना माहीत असावे ते नेमके कोणत्या कंपनीची सेवा वापरत आहेत हे समजण्यासाठी लोगो बदलण्यात आल्याचं म्हटलंय. नवा लोगो कंपनीला फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून वेगळी ओळख देणार आहे. कंपनी मार्केटिंग आणि प्रोडक्ट्ससाठी हा वापरणार आहे.

आणखी वाचा- Twitter च्या सीईओंनी ‘या’ तीन शब्दांमध्ये उडवली Facebook च्या नव्या ‘लोगो’ची खिल्ली

एका रिपोर्टनुसार फेसबुकचा नवा लोगो काही आठवड्यातच युजर्सना पाहायला मिळणार आहे. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम असे सोशल मीडिया अ‍ॅप्स तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर हे मेसेजिंग अ‍ॅप्स ‘फेसबुक’ चालवते. त्याचबरोबर फेसबुक ऑक्युलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा (‘लिब्रा’ ही डिजिटल करन्सी) अशा अनेक सुविधा देखील पुरवते. ‘फेसबुक अ‍ॅप’चाच लोगो यासाठी आतापर्यंत फेसबुक कंपनीसाठी वापरला जात होता. पण आतापासून फेसबुक कंपनी आपला नवा लोगो वापरेल, तर फेसबुक अ‍ॅपसाठी जुना लोगो हा कायम राहील. फेसबुक कंपनी आणि फेसबुक अ‍ॅप यामध्ये या नव्या अ‍ॅपमुळे फरक उठून दिसेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook launches new logo as its family grows sas