टेक दिग्गज फेसबुक कंपनीने रे-बॅन आय-वेअर कंपनी सोबत भागीदारी करून गुरुवारी ट्रू ऑगमेंटेड रिअॅलिटी ऑफरसह येणारे पहिले स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. रे-बॅन कंपनीने EssilorLuxottica सह भागीदारीत नवीन लॉंच केले आहेत. स्मार्ट ग्लासेस वापरकर्त्यांना गाणी ऐकण्याची, फोन कॉल करण्याची, तसेच ३०-सेकंदांचे व्हिडीओ आणि फोटो घेण्याची व नवीन फेसबुक व्ह्यू अॅपद्वारे फेसबुकच्या फीचर्स वापरता येणार आहेत.

रे-बॅन स्मार्ट ग्लास किंमत

‘रे-बॅन स्टोरीज’ नावाचे स्मार्ट ग्लासेसची किंमत २२,००० रुपयांपासून सुरू होणार आहे. तसेच हा स्मार्ट ग्लास २० वेगवेगळ्या स्टाईल कॉम्बिनेशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

ग्लासेसची फीचर्स

चष्मा फ्रेममध्ये दोन फ्रंट ५MP कॅमेरा बसवण्यात आला आहे. ज्याने तुम्ही फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकणार आहे. तसेच यात बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही हँड्स फ्री वापर करण्यासाठी तुम्ही स्मार्ट ग्लासेसला “Hey Facebook, take a video” अशी एक कमांड देऊन देखील वापरु शकाल.

या स्मार्ट ग्लासेसला चार्जिंग करण्यासाठी हा चष्मा खास डिझाइन केलेल्या पोर्टेबल चार्जिंग केससह येतो. तसेच या ग्लासेसला एकदा चार्ज केल्यावर तीन दिवस चार्जिंग करावी लागणार नाही. मायक्रो-स्पीकर्सचा एक संच, तीन-मायक्रोफोन ऑडिओ अॅरे, एक ऑप्टिमाइझ्ड स्नॅपड्रॅगन सीपीयू आणि एक कॅपेसिटिव्ह टचपॅड हे या स्मार्ट ग्लासेसला पॉवर देण्यास मदत करते.

“रे-बॅन स्टोरीज” मधील तीन मायक्रोफोन ऑडिओ अॅरे आहेत जे कॉल आणि व्हिडिओ कॉलसाठी परिपूर्ण बनवण्यात आले आहे. त्याचे बीमफॉर्मिंग टेक्नॉलजीमुळे आवाजाचे अल्गोरिदम उत्कृष्ट कॉलिंग अनुभव प्रदान करते, असे कंपनीने यावेळी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुम्ही घातलेल्या नवीन स्मार्ट ग्लासेसमधून काढलेले फोटो व्हिडीओ तुमच्या स्मार्ट फोन मध्ये सेव करण्यासाठी नवीन फेसबुक व्ह्यू अॅप आयओएस आणि अँड्रॉइडवर डाऊनलोड करावे लागणार आहे. तसेच घातलेल्या स्मार्ट चष्म्यावर कॅप्चर केलेली फोटो व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेसेंजर, ट्विटर, टिकटॉक, स्नॅपचॅट आणि अधिक सारख्या अॅप्सवर इम्पोर्ट करणे, एडिट करणे आणि शेअर करू शकतात.

Story img Loader