तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइनने अफगाणी युझर्सची खाती सुरक्षित केली आहेत. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइनने या आठवड्यात असं सांगितलं आहे की, तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी नागरिकांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांना लक्ष्य होण्यापासून वाचवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. फेसबुकने अफगाणिस्तानमधील युझर्सच्या खात्यांची फ्रेंडलिस्ट पाहण्याची किंवा शोधण्याची लोकांची क्षमता तात्पुरती काढून टाकली आहे. सुरक्षा धोरण प्रमुख नॅथॅनियल ग्लेचर यांनी गुरुवारी याबाबतचं ट्विट केलं आहे.
Facebook वर ‘वन क्लिक टूल’ तर Instagram वर पॉप-अप अलर्टस
ग्लेइचरने असंही म्हटलं म्हटलं आहे की, कंपनीने अफगाणिस्तानमधील युझर्ससाठी त्यांचे खातं लॉक करण्यासाठी ‘वन क्लिक टूल’ लाँच केलं आहे. त्यामुळे जे त्यांचे फेसबुक मित्र नाहीत ते त्यांच्या टाइमलाईन पोस्ट पाहू शकणार नाहीत किंवा त्यांचे प्रोफाइल फोटो शेअर करू शकणार नाहीत. “अफगाणिस्तानमध्ये आम्ही इन्स्टाग्रामवर पॉप-अप अलर्टस आणत आहोत ज्यामध्ये तुमचं खातं कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी विशिष्ट स्टेप्स असतील”, असंही ग्लेइचरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मानवाधिकार गटांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता
मानवाधिकार गटांनी याबाबत अशी चिंता व्यक्त केली आहे की, तालिबानी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर अफगाणी नागरिकांचा डिजिटल इतिहास किंवा सामाजिक संबंधांचा (डिजिटल हिस्ट्री आणि सोशल कनेक्शन्स) मागोवा घेण्यासाठी करू शकतात.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या आठवड्यात म्हटलं आहे की, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसह हजारो अफगाणींना तालिबानपासून गंभीर धोका आहे. इतकंच नव्हे तर, अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराने खेळाडूंना सोशल मीडिया डिलीट करण्याची आणि त्यांची सार्वजनिक ओळख पुसून टाकण्याचं आवाहन केलं आहे.
1/ Like so many others, many of us at Facebook have been watching the tragic events unfolding in Afghanistan. My thoughts go out to everyone on the ground and everyone trying to help as these events unfold.
— Nathaniel Gleicher (@ngleicher) August 19, 2021
तोपर्यंत Twitter ‘ती’ खाती तात्पुरती स्थगित करणार
LinkedInने लपवलं आपल्या युझर्सचं कनेक्शन
लिंक्डइनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या व्यावसायिक नेटवर्किंग साईटने तात्पुरते अफगाणिस्तानमधील आपल्या युझर्सचं कनेक्शन लपवलं आहे. जेणेकरून इतर युझर्स त्यांना पाहू शकणार नाहीत.