Is Facial Hair Removal Good For Your Skin: शरीराच्या केसांची काळजी घेणे हा ग्रूमिंगचा अत्यावश्यक भाग आहे. आपण अगदी बॉडी हेअर पॉझिटिव्हिटी विषयी कितीही व्हिडीओ पाहिले तरी केस नसलेली मऊ त्वचा प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. अशावेळी जर तुमच्या कम्फर्टनुसार तुम्हाला शेव्हिंग किंवा वॅक्सिन्ग करावेसे वाटत असेल तर विनाकारण घाबरू नका. अलीकडे अनेक स्किन केअर व्हिडीओमध्ये चेहऱ्यावरचे केस काढल्याने कशी तुकतुकीत कांती लाभते असे सांगितले जाते. पण आपण फेशियल हेअर शेव्हिंग केल्यास त्यामुळे पुन्हा जास्त व जाड केस वाढू शकतात का अशी भीती वाटते. आज आपण याविषयी त्वचा तज्ज्ञांकडून योग्य माहिती जाणून घेऊया..

डॉ गुरवीन वरैच यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले की, एकदा फेशियल हेअर काढून टाकल्यावर पुन्हा वेगाने वाढतात यात अर्धी माहिती खरी असल्याचे म्हंटले आहे. म्हणजेच केस वेगाने वाढतात हे खरं पण ते तुम्ही केस काढून टाकण्यासाठी काय पद्धत वापरता यावरही अवलंबून आहे. म्हणजेच शेव्हिंग केल्यास वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगपेक्षा केस लवकर परत येतात.

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केस काढून टाकल्यास जेव्हा ते परत येतात तेव्हा जास्त जाड असल्याचे वाटते. यात काहीच तथ्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. केस वरच्या बाजूस थोडे टोकदार असल्याने आपल्याला तसे वाटू शकते पण मुळात असे नाही.

फेशियल हेअर काढल्याचे फायदे (Pros Of Removing Facial Hair)

*केस काढण्याची ही पद्धत वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगसारखी महागडी नाही कारण फक्त रेझर विकत घ्यावा लागतो.
*ही पद्धत त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते
*मेकअप करायचा असल्यास केस नसलेली त्वचा अधिक खुलून येते, व कमी प्रोडक्टमध्ये जास्त ग्लो येतो.

फेशियल हेअर काढल्याचे तोटे (Cons Of Removing Facial Hair)

*ही प्रक्रिया वारंवार करावी लागते कारण केस पूर्णतः नष्ट होत नाहीत
*अत्यंत कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी ही पद्धत उपयुक्त नाही
*काळजी न घेतल्यास चेहऱ्यावर जखम होऊ शकते.

दरम्यान, रेझर निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने, कोणीही गोंधळून जाईल. त्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा<< हेअर स्पा क्रीम घरीच बनवायाची सोपी पद्धत; तुमच्या केसांसाठी फक्त दोन मिनिट काढा

KAI इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यू पंड्या यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, “तुमच्या शरीराच्या क्षेत्रानुसार ज्यासाठी शेव्हिंग आवश्यक आहे, तुमच्या रेझरची निवड देखील वेगळी असेल. फेशियल हेअर काढण्यासाठी सहसा L-आकाराचे टोक आणि एक लांब हँडल असणारे रेझर योग्य ठरतात, तुमच्या भुवया आणि वरच्या ओठांसाठी तुम्हाला असे रेझर हाताळायला सोपे जातात. “