Steam Tips : चेहऱ्यावर स्टीम घेताना काही चुका झाल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. जर स्टीम घेण्याची पद्धत योग्य नसेल तर त्यामुळे मुरुमांची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या वाढतात.
चेहरा धुवून घ्या.
चेहऱ्यावर स्टीम घेण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. जर चेहरा स्वच्छ नसेल तर छिद्र उघडल्यावर घाण बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते.
खूप जवळून स्टीम घेऊ नका
स्टीम खूप जवळून घेतल्याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यामुळे त्वचा जळू शकते. स्टीम घेताना चेहरा पाण्याच्या जास्त जवळ घेऊ नका.
आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट
एकाच वेळी खूप साहित्य टाकू नका
पाण्यात अनेक प्रकारचे इंग्रेडिएंट्स एकाच वेळी टाकून स्टीम घेऊ नका. त्याच वेळी, हे लक्षात ठेवा की, स्टीम घेण्यासाठी स्टीलचे भांडे निवडा, अॅल्युमिनियम नाही. स्टीमरमध्ये इंग्रेडिएंट्स टाकल्याने स्टीमर खराब होऊ शकतो.
आणखी वाचा : Health Tips : रिकाम्या पोटी या पदार्थांचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे, तुम्हाला माहिती आहे का?
स्टीमर साफ न करणे
स्टीमर नियमितपणे स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे. घाण पाण्याची स्टीम घेतल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
मॉइश्चरायझर जरूर वापरा
स्टीम घेतल्यावर चेहऱ्याला मॉइश्चरायझ न केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळत नाही. त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. स्टीम घेतल्यानंतर चेहरा चांगला कोरडा करा आणि मॉइश्चरायझर लावा.