International Day of Yoga 2024: भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करायला २०१५ पासून सुरुवात झाली. दरम्यान, बहुतेक स्त्रिया आणि मुली त्यांच्या सौंदर्याबद्दल खूपच चिंतीत असतात. त्यांना नेहमीच त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. जर आपणही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल खूप संवेदनशील असाल, तर काही योगासने करून आपण आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकाल. ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता.

फेशियल योगा करून तुम्ही तुमच्या त्वचेची चमक परत मिळवू शकता, कारण जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि त्यानंतर ऑक्सिजन त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ते अधिक फ्रेश होते. रोज योगा केल्यास निस्तेज त्वचेवर तेज येते.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
surya shukra gochar 2024 jupiter and sun will come face to face these 3 zodiac sign luck
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींवर भाग्यलक्ष्मीची कृपादृष्टी; सूर्य-शुक्र एकमेकांसमोर येताच मिळेल अपार धन अन् समृद्धी
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

चेहऱ्याचा योग का महत्त्वाचा आहे?

ज्याची त्वचा सैल आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, त्यांनी योगा केलाच पाहिजे, त्यामुळे त्यांची त्वचा घट्ट होते. तुम्ही फेशियल योगादेखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला फेस योगाबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

फेस योगा करण्यापूर्वी चेहरा वॉर्मअप करा. कारण जास्त ताणामुळे स्नायूंना ताण येऊ लागतो. तुम्ही तुमचे स्नायू जितके जास्त ताणाल, तितका तुमचा चेहरा चमकेल. म्हणून तोंड उघडा आणि जीभ बाहेर काढा. यादरम्यान शक्य तितके डोळे उघडा. हे करत असताना डोळे कधी उजवीकडे तर कधी डावीकडे हलवा. यादरम्यान डोळ्यांच्या हालचाली करा, पण चेहरा स्थिर ठेवा. दोन मिनिटे अशा प्रकारे चेहरा फिरवल्यानंतर त्याला विश्रांती द्या आणि नंतर पुन्हा पुन्हा असाच सराव करा.

तोंडात हवा भरा आणि बोटांनी हळूवारपणे मालिश करत राहा. मसाज करताना दोन्ही गाल पूर्णपणे बंद ठेवा. आता तोंडातून हवा बाहेर सोडा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने स्नायूंना आराम मिळतो. तुम्ही हे दिवसभरात पाच वेळा करू शकता.

‘डबल चीन’ कमी करेल हे आसन

जर आपल्याला ‘डबल चीन’ची समस्या असेल किंवा आपला चेहरा लोंबकळलेला दिसत असेल, तर आपली हनुवटी वर उचला आणि वर आकाशाच्या दिशेने पाहा. आता आपले तोंड सतत १० ते १५ सेकंद उघडे ठेवा आणि नंतर बंद करा, त्यानंतर चेहरा सामान्य स्थितीत आणा. दररोज चार ते पाच वेळा हे आसन नियमित करा.

हेही वाचा >> महिलांनी आठवड्यातून किती दिवस आणि कोणते व्यायाम करावेत? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

फेशियल योगा करण्याचे फायदे

  • तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते.
  • वृद्धत्वामुळे होणार्‍या येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते.