सर्वत्र जल्लोषात दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. दिवाळीतील फराळ ही प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, मिठाई, शंकरपाळ्या, करंजी, चकली चिवडा असे अनेक फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशा चविष्ट पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्ये मंडळी एका पायावर तयार असतात. दिवाळी आता संपली असली तरी अनेक घरांमध्ये दिवाळीचा उरलेला फराळ संपवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशात फराळाचे आणि मिठाईचे पदार्थ खाल्ल्याने काहीजणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात, कोणते आहेत हे घरगुती उपाय जाणून घ्या.

फराळ आणि मिठाई खाल्ल्याने होणाऱ्या अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी

आल्याचा चहा
आल्याचा चहा प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होते, तसेच पोटात गॅस झाला असल्यास त्यापासूनही सुटका मिळते. त्यामळे अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा चहा पिऊ शकता.

Diwali 2022 : दिवाळीतील मिठाई खाताना मधुमेहाची चिंता सतावतेय? या टिप्स Blood Sugar नियंत्रित ठेवण्यास करतील मदत

बडीशेपचे पाणी
पोटदुखी, गॅस, पोट फुगणे, अपचन या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेपचे पाणी फायदेशीर ठरते. बडीशेपच्या पाण्यात आढळणाऱ्या तेलापासून गॅस्ट्रीक इंजाइम बनते ज्यामुळे गॅसच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळू शकते. तसेच आतड्यांसंबंधीत समस्यांवरही बडीशेपचे पाणी फायदेशीर ठरते. अ‍ॅसिडिटी झाल्यास दुपारी जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर बडीशेपचे पाणी पिऊ शकता.

पुदिन्याचा चहा
पुदिन्यामध्ये असणारे गुणधर्म शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात असे मानले जाते. पुदिन्याचा चहा प्यायल्याने मेटाबॉलिजम सुधारते तसेच ऍसिडिटीच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. तसेच पुदिन्याचा चहा प्यायल्याने श्वासातील दुर्गंधी दुर होण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)