Glowing Skin Mask: दुपार किंवा रात्रीच्या जेवणात डाळ आवडीने खाल्ली जाते. भारतीय खाद्यसंस्कृतीतही डाळीला फार महत्व असते. आत्तापर्यंत तुम्ही तूर, मुग, मसूर अशा अनेक प्रकारच्या डाळींची चव चाखली असले. पण याच डाळीचे काही प्रकार पौष्टिक असण्याबरोबरचं ते त्वचेसाठीही फायदेशीर मानले जातात.
यात अनेकजण त्वचेसाठी मसूर डाळीचा वापर करतात. या डाळीमुळे त्वचेसंबंधीत समस्या जसे की, पिंपल्स, डाग, कोरडेपणापासून आराम मिळतो. डाळी नैसर्गिक असल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. पण मसूर व्यतिरिक्त तुम्ही इतरही अनेक डाळींचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी नॅचरल फेस मास्क बनवू शकता.
चमकदार त्वचेसाठी ‘या’ डाळींपासून बनवा फेस मास्क
मसूर डाळ फेस मास्क- मसूर डाळ त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. मसूर डाळीमुळे त्वचेवरील डाग, पिंपल्स दूर होतात. यासाठी मसूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर सकाळी त्याची पेस्ट करा आणि त्यात १ चमचा मध आणि १ चमचा कोरफड मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल.
उडद डाळ फेस मास्क- चेहऱ्यावरील डाग कमी करत त्वचा चमकदार बनवण्यासाठी उडदाची डाळ वापरली जाते. यासाठी उडीद डाळ भिजवून तिची पेस्ट तयार करा. त्यात १ चमचे मध आणि २ चमचे कच्चे दूध मिसळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
मूग डाळ फेस मास्क- मूग डाळ त्वचेसाठी फायदेशीर आहे. मूग डाळ त्वचेच्या खोल स्वच्छतेसाठी वापरली जाते. यासाठी मूग डाळ ३-४ तास भिजत ठेवा आणि नंतर प्या आणि पेस्ट बनवा. मध आणि १ चमचे दही मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहरा डीप क्लिन होईल.
मसूर डाळ आणि बेसन – मसूर डाळ बेसन चेहऱ्यासाठी प्रभावी मानले जाते. मसूर भिजवून त्याची पेस्ट बनवा. त्यात २ चमचे बेसन आणि १ चमचा दही मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. बेसन आणि मसूर यांचे मिश्रण लावल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचा चमकदार दिसते.