Flowers For Glowing Skin : फुल तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात, यामुळे महिला वेगवेगळ्या फुलांचा गजरा, वेणी केसात माळतात. पावसाळ्यात जंगल या रंगबेरंगी फुलांनी भरलेली दिसते. यामुळे विविध प्रकारचे फुलं बाजारात पाहायला मिळतात. अनेक महागड्या स्किन केअर प्रोडक्समध्येही फुलांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. निरोगी त्वचेसाठी या फुलांचा अत्यंत चांगल्याप्रकारे वापर करु शकता. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही फुलांचा वापर करू शकता. चला जाणून घेऊया नितळ आणि चमकदार चेहऱ्यासाठी कोणत्या फुलांचा फेसपॅक वापरु शकता.
नितळ त्वचेसाठी फुलांचा असा करा वापर
१) चमेलीच्या फुलांचा फेसपॅक
पावसाळ्यात चमेलीची फुलं अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात. ८ ते १० चमेलीची फुले बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता. चमेलीच्या फुलांनी बनवलेला हा पॅक चेहऱ्यावर चमक आणतो आणि टॅनिंग कमी करतो.
२) झेंडूच्या फुलांचा फेसपॅक
झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. ३ ते ४ झेंडूची फुले बारीक करून आणि त्यात 1 चमचे कोरफड जेल टाकून फेस पॅक बनवा. आता हा पॅक १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
३) जास्वंदाच्या फुलांचा फेसपॅक
जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक टॅनिंगच्या समस्येवर फायदेशीर आहे. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त जास्वंदाच्या फुलांच्या वापरामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण दूर होते. या फुलांचा फेसपॅक बनवण्यासाठी ४ ते ५ जास्वंदाची फुलांची पेस्ट बनवा आणि त्यात १ चमचा दही मिसळा. हा फेसपॅक १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.