लग्नसोहळा असो किंवा मित्रांसोबतचा गेट टुगेदर, प्रत्येक वेळी एकच हेअरस्टाइल करणे कंटाळवाणे वाटते. लांब केसांवर वेगवेगळ्या हेअर स्टाईल वापरल्या जाऊ शकतात, परंतु लहान केसांवर ते अवघड होतं. अनेक मुली त्यांच्या केसांमधील पार्टिंग बदलतात किंवा केसांच्या काही अॅक्सेसरीज वापरून केसांना वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करतात. परंतु हेअर एक्सटेंशन्समुळे केसांच्या एक्सेसरीज आणि हेअर स्टाईलच्या व्याख्याच बदलल्या आहेत. हेअर एक्स्टेंशनने तुमच्या टाळूवरील नैसर्गिक केस आणखी दाट आणि लांब दिसण्यासाठी वापरले जातात.
बाजारात अनेक प्रकारात आणि रंगात हेअर एक्सटेंशन्स उपलब्ध होतात. विशेष म्हणजे ते तुम्हाला तुमच्या नैसर्गिक केसांमध्ये उत्तम प्रकारे मिसळून तुमची आवडती हेअर स्टाईल तयार करण्याची संधी देतात. हेअर एक्स्टेंशन कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
हेअर एक्स्टेंशनचे प्रकार
चित्रपट, मालिका किंवा कोणत्याही जाहिरातींमध्ये महिला आणि मुलींचे लांब आणि दाट केस पाहिल्यानंतर आपल्यालाही असे केस असावेत असं वाटतं. काही खास हेअर स्टाईल तुम्हाला भुरळ घालतात. हे पाहून तुम्हाला असं वाटत असेल की ते आपल्या केसांमध्ये बनवता येणार नाही. मग चिंता करू नका. कारण हेअर एक्स्टेंशनचा वापर करून तुम्हाला हव्या त्या हेअर स्टाईल करता येतात. हेअर एक्सटेंशन खऱे केस किंवा सिंथेटिक केसांपासून सुद्धा बनवले जातात. केसांच्या गुणवत्तेनुसार त्यांची किंमत ठरवली जाते.
हेअर एक्स्टेंशनचा वापर केवळ फॅशन म्हणूनच नाही तर अनेक समस्यांवर उपाय म्हणूनही केला जातो. आजारपणामुळे किंवा अपघातामुळे केस गळलेल्या लोकांसाठी हेअर एक्सटेन्शन खूप उपयुक्त ठरते. क्लिप-इन्स, टेप-इन्स, वेव्हज, प्री-बॉन्ड, फ्यूजन, मायक्रो-लिंक्स इत्यादींसह हेअर एक्सटेंशनचे अनेक प्रकार आहेत. केसांच्या गरजेनुसार आणि स्थितीनुसार हे प्रकार काम करतात.
आणखी वाचा : Travel Tips: तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच प्रवास करताय? मग चुकूनही या चार चुका करू नका
उदाहरणार्थ, क्लिप-इन हेअर एक्सटेंशन फॅब्रिक किंवा सिलिकॉनला जोडलेल्या बंडलमध्ये येतो. याला एक क्लिप जोडलेली असते आणि ती रेडी टू युज असते. तुम्हाला फक्त त्यांना तुमच्या नैसर्गिक केसांच्या मध्यभागी पिनने जोडायचे असते आणि ते तुमच्या खऱ्या केसांसोबत सेट करता येतं. ते केसांचा बँड वापरण्याइतपत सहजपणे लावता येतं आणि तितक्याच सहजपणे काढता येतं.
आणखी वाचा : Health Tips : या ५ प्रकारे कोरफडीचे सेवन करा, लठ्ठपणा लगेच कमी होईल
या गोष्टी नक्की जाणून घ्या:
हेअर एक्सटेंशन नॅचरल असोत की सिंथेटिक असोत, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि ते कसे लावायचे हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने न वापरल्यास ते केवळ लुकच खराब नाही करत तर तुमच्या नैसर्गिक केसांनाही नुकसान पोहोचवू शकते. हेअर एक्स्टेंशन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा-
सिंथेटिक केस हे सहसा थोडे कडक असतात आणि त्यामुळे नैसर्गिक केसांसोबत मिसळत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल तर नॅचरल केस हा योग्य पर्याय असेल.
तुम्ही सिंथेटिक केसांना वेगळे रंग देऊ शकत नाही. कारण अनेक केसांच्या रंगांमध्ये अमोनिया आणि ब्लीच असते, ज्यामुळे हे केस खराब होतात. परंतु तुम्ही तुमच्या नैसर्गिक केसांप्रमाणेच नॅचरल हेअर एक्सटेंशन्सना कर्ल, सरळ, ब्लो ड्राय किंवा कलर करू शकता.
सिंथेटिक केसांसाठी जास्त उष्णता देखील हानिकारक असू शकते. म्हणून प्रयत्न करा की तुम्ही सिंथेटिक हेअर एक्स्टेंशन घेणार असाल तर तुम्हाला ज्या स्टाईलशी जुळवून घ्यायचे आहे तेच खरेदी करा. जेणेकरुन वेगळे काही करण्याचा त्रास होणार नाही.
मजबूत सूर्यप्रकाश सिंथेटिक हेअर एक्सटेंशनना देखील नुकसान करू शकतो. म्हणून जर तुम्हाला ते बाहेर कुठेतरी घालायचे असतील तर हे लक्षात ठेवा.
आणखी वाचा : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांना स्ट्रोकचा धोका वाढला, जाणून घ्या साधे-सोपे उपाय
हेअर एक्सटेंशन्स लावण्यासाठी लागणारा वेळ त्या त्या प्रकारावर अवलंबून असतो. त्यामुळे जर तुम्ही अशी हेअरस्टाईल निवडत असाल जी बनवायला वेळ लागेल, तर यासाठी तुमच्यासोबत अतिरिक्त वेळ ठेवा. कमी वेळेनुसार तुम्ही क्लिप-इन एक्सटेंशन्स वापरू शकता.
हेअर एक्स्टेंशन स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा ते तुम्हाला त्वचेच्या समस्या देखील देऊ शकतात. जर तुम्ही नॅचरल हेअर एक्सटेंशन वापरत असाल तर शॅम्पू आणि कंडिशनरचा योग्य वापर करा. यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. कारण हेअर एक्सटेंशनमध्ये सिलिकॉन आणि कॉपर सारख्या गोष्टी देखील वापरल्या जातात. अशा परिस्थितीत चुकीचा शॅम्पू किंवा कंडिशनर समस्या निर्माण करू शकतो.
ओले केस वाढवून कधीही झोपू नका. प्रथम त्यांना नेहमी चांगले वाळवा. अन्यथा, एक्सटेंशन खराब होऊ शकतात.