ओव्हरसाइज कपड्यांचा सध्या एक मोठा ट्रेंड पाहायला मिळतोय. पण, हे कपडे घातल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे कन्फर्ट फिल होते. तुम्ही हे कपडे योग्यप्रकारे कॅरी केलेत तर तुम्हीही खूप स्टाइलिश दिसाल. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लूकपासून ते इंटरनॅशनल रनवेपर्यंत, तुम्हाला या ओव्हरसाइज कपड्यांची लोकप्रियता दिसून येईल. यापूर्वी लोक फक्त नॉर्मल आउटिंग किंवा सहलीनिमित्त असे कपडे घालणे पसंत करत होते, मात्र आता ओवरसाइज कपडे प्रत्येक प्रकारच्या फंक्शन किंवा कार्यक्रमात परिधान केले जात आहेत. जर तुम्हीही असे कपडे त्यांचा चांगला रंग, स्टाईल पाहून ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केले असतील, परंतु अद्याप ते घातले नसतील तर तुम्ही खालील टिप्स फॉलो करून हे ओव्हरसाइज कपडे चांगल्याप्रकारे घालू शकता आणि अगदी स्टायलिस्ट दिसू शकता. चला जाणून घेऊ या टिप्स…
बॅगी पँट
ओव्हरसाइज पँट, जीन्स आणि ट्राउझर्समध्ये खूप आरामदायी वाटते. पण, त्याच्याबरोबर लूज टॉप किंवा शर्ट घालू नका, अन्यथा लूक खूप विचित्र दिसेल. त्याऐवजी फिटेड टॉपखाली तुम्ही ही पँट घाला. यामुळे लूक एकदम स्टाइलिस्ट आणि कूल दिसले, याबरोबर तुम्ही ब्लेझर घालू शकता.
स्वेटशर्ट
ओव्हरसाइज स्वेटशर्ट हिवाळ्यात कॅरी करण्यासाठी सोपा आउटफिट आहे, ज्यामध्ये अधिकचे कोणतेही कपडे घालण्याची गरज नसते. स्वेटशर्टमध्ये तुम्हाला अगदी आरामदायी वाटते, म्हणून जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असा स्वेटशर्ट असेल तर तुम्ही लेगिंग्ज किंवा स्कीन फिट जीन्ससह घालू शकता. खूप छान कॉम्बिनेशन दिसेल.
डेनिम जॅकेट
डेनिम जॅकेट जवळजवळ प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये असेल. आकर्षक लूकसाठी नी-लेंथ ड्रेसबरोबर तुम्ही हे परिधान करा. तुम्ही डेनिम किंवा बॅगी पँटसहदेखील डेनिम जॅकेट वापरून पाहू शकता. त्यासोबत स्टेटमेंट ॲक्सेसरीज घाला.
बॉयफ्रेंड शर्ट
बॉयफ्रेंड शर्टचा ट्रेंडही सध्या खूप पाहायला मिळत आहे, जो घातल्यानंतर एकदम आरामदायी वाटते, कारण साईजला अगदी सैल असल्याने तुम्ही हा शर्ट जीन्स किंवा शॉर्ट्ससोबत घालू शकता. लूक अधिक चांगला दिसावा म्हणून तुम्ही शर्टवर बेल्ट लावू शकता.
मॅक्सी ड्रेस
तुम्ही ओव्हरसाइज मॅक्सी ड्रेस बेल्टसह घालू शकता. जर तुम्ही एका दिवसाच्या आउटिंगसाठी कलरफूल ड्रेस घालणार असाल, तर त्यावर फॅब्रिक बेल्ट घालू शकता.