सुट्टीच्या दिवशी बाइक काढून फिरायला जाणं हा तरुणाईचा आवडता उद्योग. ही बाइक राइड करताना पेहरावही तसाच हवा.करोनामुळे एकाच ठिकाणी राहून राहून आपण कंटाळलो म्हणून हवापाणी बदलासाठी बाहेरगावी फिरायचे प्लान तर आवर्जून होतचं आहेत. त्यातल्या त्यात एक अफाट प्लॅन सध्या जास्त ट्रेंडिंग आहे तो म्हणजे बाइक राइडला जायचा. तुमची बाइक रायडिंगची ट्रीप एकदम फॅशनेबल होण्यासाठी बाइक रायडिंग लुकविषयी टिप्स देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेल्मेट्स

सुरक्षिततेबरोबरच बाइक रायडिंग लुक पूर्ण करण्यासाठी सगळ्यात गरजेची वस्तू. हेल्मेट्समध्ये खूप प्रकार असतात. एवढय़ा प्रकारच्या हेल्मेटमधून तुम्ही कोणता पर्याय निवडणार? सोप्पं आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी जाताय आणि कोणत्या प्रकारच्या रोडने जाताय यानुसार तुम्ही कोणत हेल्मेट घालावं हे ठरवावं. हेल्मेट फक्त काही अपघात झाला तरच आपल्याला वाचवते असं नाही. ऊन आणि वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग होतोच. तुमच्या हेल्मेटचा रंग नेहमी ब्राइट असायला हवा म्हणजे तो रस्त्यावर दिवसा-रात्री कधीही सहज दिसू शकतो. सगळ्या नीऑन रंगाच्या शेड, फ्रेश ऑरेंज, ग्रीन असे सगळे रंग सध्या ट्रेण्डिंग आहेत.

आयवेअर

कुठल्याही रोडवरून जाताना, कोणत्याही हवामानात बाइक चालवताना डोळ्यांची काळजी घ्यायलाच हवी. बाजारात खास बाइक रायडिंगसाठी ग्लासेस मिळतात. जे डोळ्यात अगदी बाजूनेही कोणतीही कचरा जाऊन देत नाहीत. गॉगल घेताना शक्यतो ब्रॅण्डेड आणि यू.व्ही. प्रोटेक्शन असलेले घ्यावेत. आणि रायडिंगच्या वेळी नेहमी गॉगलच्या एकाहून जास्त जोडय़ा ठेवणं चांगलं. गडद रंगाचे गॉगल जास्त ट्रेण्िंडग आहेत आणि गडद रंगच जास्त उपयुक्त आहेत.

ग्लोव्ह्ज

थंड ठिकाणी की कडक उन्हाच्या ठिकाणी जाताय यानुसार म्हणजे तिथल्या हवामानानुसारच ग्लोव्ह्ज निवडले गेले पाहिजेत. लेदरचे ग्लोव्ह्ज, फिंगरलेस ग्लोव्ह्ज, मोटो-क्रॉस ग्लोव्ह्ज, गौंटलेट ग्लोव्ह्ज (Gauntlet), ऑफ-रोड मोटरसायकल ग्लोव्ह्ज, स्ट्रीट ग्लोव्ह्ज, समर क्रूझिंग (Cruising) ग्लोव्ह्ज, विंटर मोटरसायकल रायडिंग ग्लोव्ह्ज असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात उपलब्ध आहेत. सगळ्या परिस्थितीचा विचार करून ग्लोव्ह्ज निवडा.

फुटवेअर

बुटाला अगदी थोडी आणि न घसरणारी हिल्स असावी. बूट आपले कोणत्याही हवामानापासून, रस्त्यावरच्या गरमीपासून संरक्षण करतात. काही रायडर जवळच्या किंवा लांबच्या रायडिंगला रग्ड हायकिंग बूट (rugged hiking) किंवा साधे वर्क बूट घालतात. रायडिंग बूट हाही एक चांगला पर्याय आहे कारण या बुटाच्या अ‍ॅकल, टो एरियाजवळ आणि हिल्सच्या इथे सॉफ्ट फोम वापरलेला असतो.

जॅकेट्स

खास रायडिंगसाठी बाजारात जॅकेट्स उपलब्ध आहेत. कोणत्याही सिझनमध्ये रायडिंगला जाणाऱ्यांकडून वॉटरप्रूफ जॅकेट्सला मागणी जास्त असते. कारण हवामानाचा अंदाज अनेकदा आपल्याला बांधता येत नाही. जाड लेदर फॅब्रिकसारखी केवलार फॅब्रिकपासून बनवलेली जॅकेट्स जास्त उपयुक्त असतात. बाकीच्या फॅब्रिकपेक्षा या मटेरीयलपासून बनवलेली जॅकेट्स आपलं जास्त चांगलं रक्षण करतात.