राज्यात सगळीकडेच तापमानाचा पारा कमी होत आहे. एव्हाना कपाटात वरच्या बाजूला ठेवलेले किंवा बॅगेत ठेऊन दिलेले थंडीचे कपडे खाली आले असतील. जाडजूड टी शर्ट आणि जीन्सही पुन्हा एकदा वापरात येतील. पण गरज म्हणून आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर आणि जॅकेट किंवा स्कार्फ वापरणे ठिक आहे. पण यातही छान फॅशनेबल राहता आले तर. थंडीत फिरायला जाण्याचे वेगवेगळे प्लॅन्स केले जातात. पण सुखद गारवा देणाऱ्या या गुलाबी थंडीत त्वचा, केस आणि कपडे यांची काळजी घेणे हेही एक कामच होऊन बसते. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या कपड्यांचे आणि त्यात थोड्या ट्रेंडी कपड्यांची भर घातली तर या ऋतुतही आपण स्वत:ला छान पद्धतीने कॅरी करु शकतो. यासाठी वेगवेगळी आणि थोडे हटके कॉम्बिनेशन करणे आवश्यक असते. असे केल्याने थंडीचा फॅशनेबल आनंद आपल्याला घेता येईल. पाहूयात मुलींसाठी थंडीत कशाप्रकारे हटके फॅशन करता येतील…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. थर्मलवेअर किंवा जाड कॉटन लेगिन्स तुम्ही मांडीपर्यंत येतील अशा टी शर्टवर घालू शकता. सध्या बाजारात अशाप्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे आणि फॅशनचे टी शर्टस उपलब्ध आहेत. यावर एखादे हटके जॅकेट घातले तरी ते छान दिसेल.

२. जीन्स हा तर जवळपास सर्वच मुलींचा आवडता पोषाख. यावर एखादा टॉप आणि त्यावर वेगळे असे श्रग किंवा जॅकेट घालू शकता. यावर एखादा स्कार्फ गळ्यात अडकवला तरीही छान दिसतो.

‘या’ मोबाईल गेम्समधून मुलांना शिकवा बेसिक गोष्टी….

३. ज्यांना थोडी वेगळी फॅशन करायला आवडते त्यांच्यासाठी प्लाझो आणि लाँग स्कर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. याच्या आत हाफ किंवा फूल लेगिन्स घातल्यास थंडी वाजणार नाही. यावरही थोडे वेगळ्या प्रकारचे स्टोल घेऊ शकता. जे तुम्हाला कानालाही वापरता येतील.

४. थंडीपासून पायांचेही रक्षण करावे लागते. त्यासाठी मोजे आणि बूट घालण्याचा पर्यायही अनेक जणी स्वीकारतात. पण हे बूट थोडे ट्रेंडी असतील तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल. यामध्ये कॅनव्हास शूजबरोबरच घोट्याच्या वर येतील असे शूज किंवा लेदरच्या शूजचाही पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.

 तरुणपणी मधुमेह झालाय? चिंता नको काळजी घ्या

५. स्वेटशर्ट आणि वेगळ्या प्रकारच्या हुडीचीही सध्या फॅशन आहे. याला मागून टोपी असल्याने गाडीवरुन जाताना कानांचे संरक्षण करणेही उपयोगी येते. यातही पिवळा, लाल अशा गडद रंगाचे हुडी असतील तर ते तुमच्यावर आणखी उठून दिसतील.

६. साधा किंवा फुल बाह्यांचा एखादा छान फ्रॉक आणि त्यावर स्कीन रंगाची टाईटस घालून त्यावर एखादे लेदरचे किंवा कॉड्राचे जॅकेट घातले तरीही ते छान दिसते. यावर हिल्सचे बूट घातल्यास लूक आणखी चांगला दिसतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion in winter season trendy look for girls