कान, नाक टोचून घातले जाणारे दागिने, अँकलेट, हातफूल, मांगटिका हे दागिने दिसतात छोटे, पण तुमच्या व्यक्तिमत्त्वाला ते वेगळाच उठाव देतात. अर्थात ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत. सध्या तरुणाईमध्ये नाक, कान टोचून घेण्याचा ट्रेण्ड आहे. मुलगा असो की मुलगी, आपल्याकडे लहानपणीच कान टोचले जातात. या आधीपासूनच असलेल्या टोचण्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी टोचून घेऊन स्टड किंवा रिंग्स घातल्या जातात. तसेच नाक टोचून त्या टोचणात रिंग किंवा खडे घातले जातात. मुलींच्याबरोबरीने मुलांमध्येही हा ट्रेण्ड प्रचलित आहे. आयुष्यमान खुराना यानेही अलीकडेच नाकात रिंग घातली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कान व नाक टोचून घेताना त्याचे दोन प्रकार असतात. पारंपरिक पद्धतीने सोनाराकडे जाऊन कान किंवा नाक सोन्याच्या तारेने टोचून घेणे किंवा गन शॉट पद्धतीने तुम्ही टोचून घेऊ शकता. तसेच हल्ली प्रेस करायच्या नोस पिन्स मार्केट गाजवत आहेत. तसेच अँकलेट, ब्रेसलेट, हातफुल, नाजूक मांगटिका, वेगवेगळे इयर पिस असे लहान लहान दागिने सध्या खूपच प्रचलित आहेत. हे दागिने आकाराने लहान असूनही आपल्या दिसण्यामध्ये ते उठावदारपणा आणतात.
पारंपरिक पद्धतीने टोचून घेणे
या प्रकारात तुम्हाला एखाद्या सोनाराच्या दुकानात जाऊन ज्या प्रकारचे कानातलं किंवा नाकातील घालायचं असेल त्यानेच नाक व कान टोचून मिळतात. टोचताना आणि त्यांनतर काही दिवस मात्र तो भाग दुखतो. ही पद्धत सोपी असते आणि हे काम नियमित करत असल्यामुळे सोनाराकडची माणसं त्यात तरबेज असतात. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक कान व नाक टोचून मिळतात.
गनशॉट पद्धत
या पद्धतीमध्ये एका यंत्राद्वारे तुम्ही कान, नाक टोचून घेऊ शकता. त्या यंत्राला बंदुकीप्रमाणे ट्रिगर असतो. आणि त्या यंत्राच्या पुढच्या भागात स्टड अडकवलेला असतो. ट्रिगर दाबला की तो स्टड तुम्हाला हवा तिकडे टोचून मिळतो. ही प्रक्रिया काहीशी वेदनादायक असते. कारण अचानक स्टड नाकात किंवा कानात टोचला जातो आणि त्यामुळे दुखण्याची शक्यता जास्त असते.
काही महत्त्वाच्या टिप्स
१. शक्यतो सोनाराकडे जाऊनच नाक- कान टोचून घ्यावेत. ते जास्त सुरक्षित असतं.
२. गन शॉट पद्धतीने करणार असाल तर पातळ तारेचा स्टड निवडावा जेणेकरून जास्त दुखणार नाही.
३. कोणत्याही पद्धतीने टोचून घेतलं तरीही दोनतीन आठवडे हलक्या हाताने तेल लावावं. जेणेकरून तो भाग मऊ राहील आणि जखम होणार नाही.
४. सोनाराकडून टोचून घेणार असाल तर लगेच खडय़ाने किंवा इतर कशानेही टोचून घेण्यापेक्षा सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेनेच टोचून घ्या.
५. तार टोचली कीती त्या भागामध्ये व्यवस्थित फिरते आणि फोड येण्याची शक्यता कमी असते.
६. काही वेळा टोचल्यांनतर फोड येतो. अशा वेळी कोणत्याही पद्धतीने तो घालवायचा प्रयत्न करू नये. आपोआपच तो निघून जाईल. त्यावर थोडे थोडे कोमट तेल घालावे.
७. तार टोचून घेतली की लगेचच ती काढून त्याजागी इतर काहीही घालायचा अट्टहास करू नये. काही महिने तार तशीच ठेवावी. ती नोज िरगप्रमाणेच झकास दिसते.
८. योग्य आणि सुरक्षित पद्धतीने टोचून घेतलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही.
९. टोचून घ्यायची भीती वाटत असेल तर हल्ली बाजारात वेगवगेळ्या पद्धतीच्या प्रेस नोज पिन्स आणि इयिरग मिळतात.
हटके दागिन्यांचे काही प्रकार
१. नोज पिन्स : आकाराने मोठय़ा पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नोजपिन्स सध्या खूप प्रचलित आहेत. कमळ, स्वस्तिक, विविध इतर फुलांचे आकार, ग्राफिक्स, ढाल, मुखवटा अशा नाना तऱ्हेच्या नोज पिन्स सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत. जर्मन सिल्व्हरपासून बनलेल्या या नोजपिन्स खूप सुंदर दिसतात. सध्याच्या बोहो ट्रेण्डला अगदी साजेशा अशा या नोज पिन्स साडीपासून वेस्टर्न वेयपर्यंत सगळ्या कपडय़ांवर शोभून दिसतील.
२. अँकलेट : तरुणाईमध्ये सध्या अँकलेट खूप लोकप्रिय आहेत. हा केवळ मुलींनी घालायचा दागिना राहिला नसून मुलंसुद्धा आवडीने अँकलेट वापरतात. असंख्य प्रकारची अँकलेट्स सध्या बाजारात मिळतात. मोती, हिरे, गोंडे, रंगीत खडे इत्यादी वापरून ही अँकलेट्स बनविली जातात. पातळ, जड जशी आवडतील तशी अँकलेट्स मिळू शकतात. रंगीत दोऱ्यांची विणलेली अँकलेटसुद्धा सध्या बाजारात आहेत. हल्ली ग्राफिक्स वापरूनसुद्धा अँकलेट्स बनविली जातात.
३. हातफुल : हातफुल हा ब्रेसलेटचा एक वेगळा आणि ट्रेण्डी प्रकार आहे. यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि अनेक तरुणींना ते आवडतात. अगदी पातळ चेनपासून ते जाड डिझाइनची हातफुलं बाजारात मिळतात. नेहमीच्या वापरासाठी पातळ चेन, बारीक हिरे, वेगवेगळे स्टोन, विविध ग्राफिटी अशा प्रकारची हातफुलं तुम्ही वापरू शकता. लग्नांमध्ये, समारंभात वापरण्यासाठी डिझायनर हातफुलं उपलब्ध आहेत. त्यात मिरर वर्क, जडाऊ कुंदन, गोंडे, विविध मेटल फुलं वापरून तयार केलेली हातफुलं तुम्ही वापरू शकता.
४. मांगटिका : सध्या विविध समारंभांसाठी मांगटिका किंवा बिंदी वापरण्याचा ट्रेण्ड आहे. मारवाडी, गुजराथी संस्कृतींमधील हा दागिना सध्या खूप पॉप्युलर आहे. त्याची अनेक सुंदर रूपं बाजारात आहेत. नाजूक चेन, गोंडे, हिरे, मोती, अनेक रंगीबेरंगी धागे यांनी हा दागिना सजविला जातो. बोहो ट्रेण्डमधील अनेक मोटीफ या दागिन्यासाठी वापरली जातात. नेहमीच्या लहान लहान समारंभांसाठी हा दागिना खूप छान दिसतो.
मोठय़ा समारंभांसाठी माथा पट्टी हा त्यातील एक प्रकार वापरू शकता. मोठय़ा समारंभांसाठी सोने, चांदी, कुंदन, पाचू, माणिक यांपासून मांगटिका सजविला जातो.
अशा प्रकारचे लहान लहान वाटणारे दागिने तुमच्या दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समारंभांमध्ये किंवा रोजच्या वापरात असे दागिने नक्कीच वापरून बघा. तुम्हाला वाहवा मिळणारच.
प्राची परांजपे
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा