Kolhapuri saaj सण-उत्सवांना सुरुवात झाली की महिलांची पावलं मॅचिंग दागिन्यांच्या खरेदीसाठी दुकानांकडे वळू लागतात. दागिन्यांच्या डिझाईनचा ट्रेण्ड सध्या बदलत आहे. पारंपरिक दागिन्यांची मागणी आता पुन्हा एकदा वाढली आहे. तरुण पिढीलाही हल्ली जुन्या पारंपारिक दागिन्यांच्या डिझाईनची भुरळ पडत आहे. दरम्यान यावर्षीच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या कोल्हापुरी साज हा दागीना ट्रेंड होत आहे. महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये कोल्हापूरी साज हा एक खास नेकलेसचा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. हा साज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनवला जातो पण यामध्ये कोल्हापूरी साज प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी साज हा मराठी स्त्रियांमध्ये फार प्रचलित असलेला दागिना आहे.अतिशय सुंदर आणि शोभिवंत दिसणाऱ्या या दागिन्यांची पाहणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापुरी साज हा दागिना असून तो लाखेपासून बनवला जातो. लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो. कोल्हापुरी साजमध्ये ‘जाव मणी’ आणि ‘पानड्या’ (वेगवेगळ्या आकाराची पाने) सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात. कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठया प्रमाणात वापरून त्याचे नामकरण ‘कोल्हापुरी साज’ असे केले. या साजात मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात. मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे त्यात काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे मणी वापरण्याची प्रथा आहे. हा गळ्याभोवतीच पण जरा सलसर बसतो आणि यात चंद्र, कमळ, मासा पूर्वी हा फक्त सवाष्ण बायकाच घालीत, पण आता सरसकट वापरात आढळतो. ते त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. हा दागिना ६० वर्ष पासून प्रसिद्ध आहे.

पाहा कोल्हापूरी साज

Photo: @makeup_artist_trupti
Photo: @makeup_artist_trupti
Photo: @makeup_artist_trupti

हेही वाचा >> Chintamani First Look 2023: चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा फर्स्ट लूक आला समोर; बाप्पाचं देखणं रूप पाहतच राहाल

हा दागिना स्त्रिया मंगळसूत्राऐवजी परिधान करतात. या आभूषणामध्ये २१ लोंबते डूल असून त्यांपैकी १० डूल हे भगवान विष्णूचे अवतार, ८ डुलांचे एक अष्टमंडल, १ डूल माणकाचा, एक पाचूचा आणि एक डूल म्हणजे “डोरला” म्हणजे तावीज असतो. तो लाल किंवा गुलाबी रंगाचे असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion trend womens kolhapuri saaj look trending jewellery kolhapuri saaj price srk