नऊ दिवसांतला मनातला उत्साह, बेधुंदपणा पेहरावातून अर्थात घागऱ्यातूनही दिसतो. म्हणूनच तो घेरदार घागरा सप्तरंगांत रंगून गेलेला असतो. हजार रुपयांपासून ते लाखभर रुपयांपर्यंत किमतीच्या या घागऱ्यांना नवरात्रीत फार मागणी असते.
या वर्षीच्या फॅशन विश्वात वेल्वेट, निऑन आणि ब्रॉकेड या तीन स्टाइल इन आहेत. त्यामुळे तुम्ही कपडे विकत घेताना किंवा खास दसऱयासाठी कुर्ते किंवा पंजाबी ड्रेस शिवताना त्या तिघांपैकी एका स्टाइलचा तरी नक्कीच विचार करा. कोणतीही स्टाइल करायची म्हणजे आवडत्या रंगांचा सर्वात आधी विचार केला जातो. नवरात्र म्हणजे तर विविध रंगांची उधळणच! सध्या इन असणा-या रंगांचा वापर करून शिवलेले किंवा रेडिमेड कपडे घेण्यावर तरुणाईचा जास्त भर आहे. सध्या डीप ग्रीन, डीप पर्पल, बेज, टॅन, बरगडी, शॉकिंग पिंक, डस्की पिंक, ब्राऊन, ग्रे, ऑलिव्ह, रेड, नेव्ही ब्ल्यू, मस्टर्ड डॅपल्ड या रंगांचा ट्रेण्ड फॅशन विश्वात रुजू होतो आहे. त्यामुळे या नवरंगांबरोबरच तुम्ही हे रंगही ट्राय करू शकता. तुम्ही किती फॅशन अपडेटेड आहात हे दाखवायची आयती संधी तुम्हाला मिळतेय. निऑन रंगाच्या लेसमुळे तुमच्या प्लेन कुर्त्यांला फॅशनेबल लुक मिळतो. त्यामुळे लेस लावायचा विचार करत असाल तर हा पर्याय एकदम रॉकिंग ठरेल. टेम्पल किंवा चक्री असलेल्या लेसचा वापरसुद्धा एका मोठया फॅशन शोमध्ये केला होता.
वेल्वेट फॅब्रिक मुळातच रॉयल इफेक्ट देणार असतं. पण वेल्वेटमध्ये रंगांची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते. खूप गडद किंवा शॉकिंग रंगांचं वेल्वेट वापरून भयानक वाटण्यापेक्षा कुर्त्यांच्या किंवा ड्रेसच्या वरच्या भागाला जरी आवडत्या आणि मॅचिंग प्लेन रंगाच्या वेल्वेटचा कपडा लावला तरी याला रिच लुक येऊ शकतो. ही स्टाइल नाही आवडली, तर तुम्ही ब्रॉकेड फॅब्रिकचाही विचार करू शकता. पण ब्रॉकेड फॅब्रिक म्हणजे यात ब-यापैकी भडक रंगांचा वापर असतो. त्यामुळे अजून त्यावर हेवी वर्क केलेल्या लेस लावण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही नवरंगांचे इरकल किंवा खणाच्या कपडयाचे स्लिव्हलेस जॅकेटसुद्धा शिवून घेऊ शकता. कलर ब्लॉकिंगचा ट्रेंडही नव्याने रुजू होतो आहे. त्यामुळे प्लेन रंगाचे कुर्ते आवडत नसतील तर दोन किंवा अधिक रंग एकत्र घेऊन तुम्ही कुर्त्यांमध्ये कलर ब्लॉक तयार करू शकता. खास दसऱयासाठी गरबा खेळताना घालण्यासाठी फॅशनेबल कपडे घालण्याची मुलांमध्येही चढाओढ असते. मुलांमध्येही सध्या एक नवीन ट्रेण्ड रुजू होतो आहे. आगामी रामलीला चित्रपटात रणवीर सिंगने केडिया आणि त्याखाली पारंपरिक धोतर घालण्याऐवजी जिन्स घातली आहे त्यामुळे या नवरात्रीत मुलांनी हा लुक फॉलो करायला काहीच हरकत नाही.