भरली केळी

साहित्य : केळी – ३ (पिकलेली साल काळी झालेली), घट्ट नारळाचं दूध – १ वाटी
चवासाठी: ओलं खोबरं – १ नारळ (२ वाटय़ा), गूळ – १ वाटी (बारीक चिरलेला), वेलची पावडर – १ चमचा, साजूक तूप – १ चमचा

Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
Husband wife relationship There is no way to get angry Patience is essential
तुमच्याही बाबतीत असं घडतंय?

कृती : प्रथम चवाचे सर्व साहित्य एकत्र करून पातेलं गॅसवर ठेवा. गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर घाटत राहा आणि चव करून घ्या. राजेळी केळ्याचे अखंड साल काढून घ्या. केळ्याचे २-३ तुकडे करून त्याला मधे चिर पाडा. एक पसरट पातेलं घेऊन त्याला खाली साजूक तूप लावा आणि त्यावर केळीच्या साली पसरा. केळ्याच्या पाडलेल्या प्रत्येक चिरेमध्ये चव भरपूर भरा. पातेल्यात ही भरलेली केळी एका थरामध्ये नीट पसरून लावा. पातेलं गॅसवर ठेवा. केळ्याच्या बाजूने नारळाचे दूध पातेल्यात सोडा. वर झाकण ठेवा, झाकणावर वजन ठेवा आणि चांगली वाफ आणा.आंबट-गोड अशी केळ्यांची चव फार छान लागते. राजेळी केळी न मिळाल्यास मद्रासी मोठी केळी वापरावी. बाजारातून घरी आणून ही केळी साल पूर्ण काळी होईपर्यंत पिकवून नंतर वापरावीत.

रताळ्याचा कीस

साहित्य : रताळी – २ मोठी, शेंगदाण्याचा जाडसर कूट – १ वाटी, ओलं खोबरं – १/२ वाटी, साजूक तूप – १/४ वाटी, हिरवी मिरची – ५-६ बारीक चिरलेली किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त, जिरे – १ चमचा

कृती : प्रथम रताळी स्वच्छ धुऊन सालासकट किसून पाण्यात ठेवा. कढईत तूप आणि जिरं टाका. जिरे तडतडल्यावर मिरची घाला. त्यावर पाण्यात किसून ठेवलेली रताळी पिळून घाला आणि परता. त्यावर मीठ, साखर घालून शिजवून घ्या. वाफ आल्यावर त्यात दाण्याचा कूट, खोबरं घालून नीट एकत्र करा आणि परत वाफ आणा.टीप : रताळ्याचे सत्त्व पाण्यातून रताळ्याचा कीस काढल्यावर पाणी तसेच १-२ तास ठेवा. रताळ्याचे सत्त्व तसेच खाली बसेल. वरचं पाणी काढून टाका आणि सत्त्व काढून घ्या. १ वाटी सत्त्वाला २ वाटय़ा दूध आणि चवीप्रमाणे साखर घालून १/२ चमचा वेलची पावडर घालून गॅसवर गरम करत ठेवा. सतत ढवळत राहा. घट्ट झाल्यावर एका थाळीत काढून पसरून घ्या आणि थंड झाल्यावर वडय़ा पाडा. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

बटाटय़ाची पांढरी आमटी

साहित्य : बटाटे – २ चौकोनी चिरलेले, शेंगदाण्याचा कूट – १/२ वाटी, ओलं खोबरं – १ चमचा, साजूक तूप – २-३ चमचे, हिरवी मिरची – २-३ किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त, मीठ – चवीप्रमाणे, साखर – १ चमचा, जिरं – १/२ चमचा, आंबट ताक – १/४ वाटी

कृती : दाण्याचा कूट, खोबरं आणि मिरची पाणी घालून बारीक वाटून घ्या. पातेलीत तूप गरम करून त्यावर जिरे घाला. जिरे तडतडल्यावर बटाटे घालून चांगले परतून घ्या. त्यात पाणी, मीठ, साखर घालून बटाटे नीट शिजवून घ्या. त्यावर दाण्याच्या कुटाचे वाटण आणि ताक घाला. चांगली उकळी आणून वरून १ चमचा दाण्याचे कूट घाला. साबुदाणा खिचडी, वरीचा भात, उपवासाची भाकरी वगैरे बरोबर ही आमटी खूपच छान लागते. टीप : सर्व उपासाच्या पदार्थाना साजूक तुपाऐवजी शेंगदाण्याचे तेल वापरू शकता. ज्यांना उपवासाला कोिथबीर चालते त्यांनी वरून कोिथबीर घालावी.

वरी तांदळाचा गोड शिरा

साहित्य : वरी तांदूळ – १ वाटी, ओलं खोबरं – १/४ वाटी, साखर – ३/४ वाटी, साजूक तूप – १/२ वाटी, केळं – १ गोल कापून, वेलची पावडर – १/२ चमचा, केशर – ६-७ काडय़ा, दूध – १ वाटी, वेलची झ्र् २ बदामाचे तुकडे – आवडीप्रमाणे

कृती : प्रथम केळ्याचे काप साजूक तुपात परतून घेऊन बाजूला ठेवा. पातेल्यात तूप गरम करून त्यात वेलची फोडून घाला. त्यावर वरी तांदूळ, बदामाचे तुकडे आणि खोबरे घालून चांगले परतून घ्या. त्यावर वाटीभर गरम दूध व १ वाटी गरम पाणी घालून वरी तांदूळ नीट शिजवून घ्या. त्यावर साखर, वेलची पावडर आणि केशर घाला. नीट मिक्स करून वरून तूप घाला व चांगली वाफ आणा. शेवटी तुपात परतलेलं केळं घालून मिक्स करा.

स्टफ साबुदाणा वडा

साहित्य : साबुदाणा – १ वाटी, (रात्रभर भिजवावा), बटाटे – २ उकडलेले, हिरवी मिरची – ४-५ क्रश केलेली किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त, शेंगदाण्याचा कूट – १ वाटी जाडसर, मीठ – चवीप्रमाणे, साखर – १ चमचा, शेंगदाणा तेल – तळण्यासाठी, दही – सोबत खाण्यासाठी

स्टफिंग : ओलं खोबरं – १ वाटी, हिरव्या मिरच्या – १-२ क्रश केलेल्या किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त, मीठ – चवीप्रमाणे, साखर – १/२ चमचा, लिंबाचा रस – १/२ चमचा हे सर्व साहित्य एकत्र करा.

कृती :
उकडलेला बटाटा कुस्करून घ्या. त्यात भिजवलेला साबुदाणा, क्रश्ड मिरची, मीठ, साखर आणि दाण्याचा कूट मिसळून नीट एकत्र करा. त्याचे एकसारखे गोळे करा. एकेका गोळ्याची वाटी करून त्यात खोबऱ्याचे स्टिफग भरा आणि वाटी नीट बंद करा. हाताला थोडं तूप लावून वडा थोडा चपटा करा.शेंगदाणा तेलात खमंग तळून घ्या आणि दहय़ाबरोबर सव्‍‌र्ह करा.टीप : आत खोबऱ्याचं स्टिफग असल्यामुळे चटणीची गरज लागत नाही.