उद्यापासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. काहीजण नऊ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काहीजण दिवसभर उपाशी राहून रात्री एक वेळेस जेवण करतात. नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. पण सोबतच आपल्या शरीरासाठी उत्तम मानलं जातं. उपवास पकडल्याने आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात.
पण नवरात्री उपवास करताना स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. जर योग्य मार्गाने हे उपवास केले नाहीत तर याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या नवरात्रीत उपवास पकडण्यासाठी विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच नवरात्रीत पाळले जाणारे काही समज आणि गैरसमजांपासून स्वतःला दूरच ठेवा. यासाठी फूड थेरपिस्ट रिया बॅनर्जी अंकोला यांनी सुचवलेल्या काही खास टिप्स नक्की लक्षात ठेवा.
फूड थेरपिस्ट रिया बॅनर्जी अंकोला यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवरात्रीत उपवास पडकण्याबाबतच्या काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. उपवास करताना जर तुमचं शरीर आणि मन दोन्ही साथ देत नसेल तर उपवास करण्याचं टाळा. उपवास केल्याने सात्विक उर्जेत वाढ होते आणि आपले मन अधिक शांत आणि सजग होते. सत्वाच्या तजेल्याने शरीर अधिक हलकेफुलके आणि उर्जावान बनते. आपण अधिक कार्यक्षम होतो. त्याचे फळ म्हणजे, आपल्या इच्छा साकार होऊ लागतात आणि आपली सर्व कार्ये सहजपणे सिद्धीस जातात.
यासोबत फूड थेरपिस्ट रिया बॅनर्जी अंकोला यांनी नवरात्री दरम्यान पाळले जाणाऱ्या समज आणि गैरसमजाबद्दलच्या सत्या परिस्थितीचा देखील उलगडा केला.
१)
समज: उपवासादरम्यान दररोज साखर आणि तळलेले पदार्थ खावेत जेणेकरून ते तुम्हाला खूप ऊर्जा देतील.
तथ्य: जास्त साखरेमुळे शरीरात अनावश्यक इन्सुलिन स्पाइक्स आणि साखरेचं प्रमाण कमी-जास्त होतं आणि तुम्हाला दिवसभर भुकेच्या तीव्र वेदना होतात. म्हणूनच तज्ज्ञांच्या यामुळे तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते.
यापुढे बोलताना फूड थेरपिस्ट रिया बॅनर्जी अंकोला म्हणाल्या, “उपवासाच्या काळात अनेकजण पिष्टमय पदार्थ आवडीने खातात. त्यात अनेकदा फायबर नसतात. उपवासाचे अनेक पदार्थ तेलात आणि तुपात शिजवले जातात. ते पचायला अतिशय जड असतात. त्यामुळे अॅसिटीडीची आणि नंतर पचनाची समस्या निर्माण होण्याची भीती असते. याचा परिणाम आपल्या ह्रदयावर सुद्धा होऊ शकतो.”
२)
समज: दिवसभर फळे, तळलेले पदार्थ आणि ज्यूस पिल्याने शरीरातील ऊर्जा पातळी उच्च राहते.
तथ्य: फळे, सुका मेवा, बटाटे आणि साबुदाणा सारख्या पदार्थामधून नैसर्गिकरत्या स्टार्च मिळतं. पण हे पदार्थ तुमच्या शरीराला अनुरूप आहेत का हे तपासणं आधी गरजेचं आहे. उपवासादरम्यान बहुतांश जण सकस आहार, फळे, फळांचा रस, द्रवयुक्त आहार, उकडलेल्या अन्नाचे सेवन करतात. हा आहार आपल्या त्वचेसाठी लाभदायक ठरतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.