Navratri Fasting healthy diet tips : नवरात्री २०२४ अगदी जवळ आली आहे आणि जर तुम्ही उपवास करण्याचे ठरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. दरम्यान नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताना योग्य मार्गाने उपवास करणे महत्त्वाचे आहे. ९ दिवसांचे उपवास करण्याची पद्धत बहुतांश घरांमध्ये असते. उपवास म्हटला की उपवासाचे पदार्थ आणि नेहमीचा स्वयंपाक वेगळा असे दोन्ही करावे लागते. घरातले, बाहेरचे आणि देवीचे सगळे करता करता बरेचदा उपवासाचे वेगळे काही करण्याचा कंटाळा केला जातो. बहुतांशवेळा उपवास हा घरातील महिला वर्ग करत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जातेच असे नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला उपवास करताना काय लक्षात ठेवावे काय काळजी घ्यावी याबाबत काही टिप्स देणार आहोत.

नवरात्री दरम्यान उपवासादरम्यान पोषणतज्ञ उर्वी गोहिल यांच्या मते, तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्यास तुम्ही नवरात्रीच्या उपवासात स्वतःला निरोगी ठेवू शकता

अति खाऊ नका

उपवास असताना उपवासाचे पदार्थ अति प्रमाणात खाऊ नका. तज्ञांच्या मते, जास्त खाल्ल्याने तुम्हाला पोट फुगलेले आणि सुस्त वाटू शकते, जे तुम्हाला तुमच्या उपवासाच्या दिवसांमध्ये नको असते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खा जे हलके असतील आणि तुम्हाला पूर्ण आणि तृप्त ठेवतील.

चहा कॉफी आणी खारट पदार्थांचे सेवन मर्यादित करा

उपवास असल्यावर चहा पिणे, खारट पदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो मात्र यामुळे जास्त कॅफीन आणि खारट पदार्थ निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आळशी आणि थकवा येऊ शकतो. तसेच, नमकीन आणि चिप्स सारखे खारट स्नॅक्स तुमच्या पचनसंस्थेमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे उपवास करताना ताजी फळे, साबुदाण्याची खिचडी इत्यादी पौष्टिक पर्यायांसह आपल्या इच्छित पदार्थांची अदलाबदल करा.

भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा

उपवास असताना भरपूर पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. तज्ञांच्या मते, नारळाचे पाणी, ताज्या फळांचे रस किंवा पुदिना रसाचा एक रीफ्रेशिंग ग्लास असे विविध पर्यायांचा तुम्ही समावेश करु शकता. पचनास मदत करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता. हायड्रेटेड राहिल्याने तुम्हाला ऊर्जा मिळतेच असे नाही तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

नवरात्रीच्या उपवासात तुम्ही काय खाऊ शकता?

१. आता आपण नवरात्रीच्या उपवासात आरोग्यदायी पद्धतीने उपवास कसा करायचा हे जाणून घेतले आहे. आता त्या काळात तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता ते पाहूयात.

२. राजगिरा पीठाची भाकरी, लाल भोपळा, भेंडी, काकडी, सुरण, रताळी या भाज्या खाऊ शकतो.

३. वऱ्याचे तांदूळ किंवा थालीपीठ केले तरी त्यातही बटाट्याबरोबर काकडी, भोपळा , रताळी, सूरण या भाज्या घालायला हव्यात.

४. भगरीसोबत आपण आणि दाण्याचीआमटी करतो, त्याऐवजी शिंगाड्याची कढी किंवा आमसूलाचे सार करायला हवे, साधं ताकही घेता येईल.

५. नाश्त्याला बरेच जण गरमागरम साबुदाणा खिचडी खातात. तसेच चहा किंवा कॉफीही आवर्जून घेतली जाते. त्याऐवजी उकडलेलं रताळं आणि दूध, राजगिऱ्याच्या लाह्या आणि दूध किंवा दही असं आवर्जून खायला हवं.

६. नवरात्रीच्या काळात तुम्ही फळे आणि सुका मेवा खाऊ शकता. एक वाटी दह्यासोबतही तुम्ही या फळांचा आस्वाद घेऊ शकता.

हेही वाचा >> Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या

७. तुम्ही उपवासाच्या वेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दह्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे आतडेही निरोगी आणि थंड राहू शकतात. इतर पदार्थांमध्ये पनीर, पांढरे लोणी, तूप, मलई आणि दूध आणि खवा असलेले पदार्थ यांचा समावेश होतो.