4 Healthy Drinks To Reduce Belly Fat : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात; पण तरीदेखील काही उपयोग होत नाही. वजन वाढले की, सर्वांत आधी पोट वाढलेले दिसू लागते. पोटावरची चरबी वाढली की, शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. पण, पोटावरची चरबी ही आरोग्यासाठीदेखील धोकादायक ठरू शकते. पोटाची चरबी कमी करणे कठीण काम आहे. कारण- शरीराच्या या भागात जमा झालेली चरबी सहजासहजी कमी होत नाही. पण- तुम्ही काही आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करून पोटावरची चरबी कमी करू शकता.
जादा वजन कमी करणे महत्त्वाचे असले तरी पोटाची चरबी कमी करणे गंभीर आणि थोडे कठीणदेखील आहे. त्यासाठी आहारासह शिस्तबद्ध व्यवस्था आवश्यक आहे. परंतु, अधिक महत्त्वाचे म्हणजे लक्ष्यित व्यायाम करणे. त्यामुळे कोणतेही शॉर्टकट नसतानाही, काही सामान्य पेयांचा सकारात्मक परिणाम होतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी
आरोग्य चांगलं राखायचं, तर आपल्या दिवसभराच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करायलाच हवा, असा अनेकांचा आग्रह असतो. ग्रीन टीमुळे वजन कमी होते म्हणून तर घरी, ऑफिसमध्ये दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी पिणारे अनेक जण आहेत. आहारतज्ज्ञांच्या मते- ग्रीन टी प्यायल्याने बाॅडी डिटाॅक्स होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रीन टी पिणे आवश्यक असते.
दालचिनी टी
दालचिनी हा एक असा मसाला आहे; ज्याच्या चहामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता (IR) कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी पेय आहे. ओटीपोटात चरबी जमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे आयआर. दालचिनी टीच्या सेवनाने ओटीपोटातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. दालचिनीदेखील एक बूस्टर आहे. चवीमध्ये गोड असलेली दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगली आहे. एक चांगला संशोधित मसाला आहे, जो शतकानुशतके त्याच्या आरोग्याच्या फायद्यांसाठी वापरला जात आहे. एक कप दालचिनीचा चहा घेतल्याने केवळ अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत नाही, तर तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
कॉफी
रिसर्च गेटवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात शरीरातील चरबी विशेषत: व्हिसेरल फॅटवर सतत कॉफीच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. त्यांना आढळले की, कॉफीचे मध्यम (दिवसातून दोन ते तीन कप) सेवन , शरीरातील चरबी विशेषतः व्हिसेरल फॅट कमी करण्यात लक्षणीय बदल दर्शविते. कॉफीमधील पॉलीफेनॉल – क्लोरोजेनिक अॅसिड पोटाची चरबी कमी करते, असे दिसून आले आहे.
हेही वाचा >> सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज’ पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक; जाणून घ्या काय काळजी घ्यायला हवी…
मध
मध हा वजन कमी करण्याचा नैसर्गिक उपाय मानला जातो. मध औषधी गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त फिटनेस सुधारण्यासाठीही ओळखला जातो. वजन कमी करण्यासोबत मध आरोग्य सुधारण्यासही मदत करतो. त्याशिवाय डोळे, सर्दी-कफ, त्वचा, हृदयाच्या निगडित समस्या यांसह मूत्रमार्गाच्या त्रासांवरही फायदेशीर ठरते.
या सर्व आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करून, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायामही तेवढाच गरजेचा आहे हे लक्षात ठेवा.