How To Make Private Parts Skin Cool Down: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना कॉटनचे फ्रॉक, छान ट्रेंडी कॅज्युअल वन पीस, कधी बीचवर वैगरे गेल्यास शॉर्ट्स घालायला आवडतात. शिवाय याच दिवसांमध्ये लग्नाचा सीझन आल्याने अनेकदा साड्या नेसायची सुद्धा वेळ येते. तुम्हाला या कपड्यांची कितीही आवड असली तरी एक काळजी तुम्हाला हे सगळे फॅशन प्रयोग करण्यापासून अडवू शकते आणि ती म्हणजे मांड्यांची जळजळ.
फक्त जाड किंवा अतिवजन असलेल्यांनाच नव्हे तर अगदी बारीक महिलांना सुद्धा हा त्रास जाणवतो. विशेषतः हवा लागण्यासाठी जागा नसल्याने मांड्यांच्या आतील बाजूस खूप घाम येऊन जळजळ जाणवू शकते. चारचौघात यावर तुम्हाला लगेच काही उपायही करणे शक्य नसते. काही वेळाने तर अगदी चालण्याचीही ताकद उरत नाही. म्हणून आज आपण हा त्रास टाळण्यासाठी आधीच काय उपाय करता येईल हे पाहणार आहोत.
अनेकदा अंडरवेअर स्वच्छ नसेल अथवा काही कारणाने एक – दोन दिवस तीच अंडरवेअर घातली तर ही समस्या नक्कीच होते. यामुळे मांड्यांसह व्हजायनल संसर्गाचाही धोका असतो.
शक्यतो नेहमीच स्वच्छ अंडरवेअर वापरावी. उन्हाळ्यात कॉटनच्या अंडरवेअर घाम शोषून घेण्यास उत्तम ठरतात.
साडी किंवा वेस्टर्न ड्रेस घालताना आत स्पॅन्डेक्स शॉर्ट्स घाला, कारण ते मांडीचे घर्षण टाळण्यास मदत करतात
आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी हायड्रेटेड रहा. यामुळे वारंवार घाम येण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.
ओलावा जमा होण्यापासून रोखण्यासाठी तुमच्या मांड्यांच्या आतील भागास पावडर लावा. कॅन्डिड पावडर किंवा विशेषतः घामोळ्यांची पावडर यावर उत्तम उपाय ठरतो.
हे ही वाचा<< डोळ्यात दिसतात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याची ‘ही’ लक्षणे; दृष्टीवरही होऊ शकतो परिणाम, आजच ओळखा संकेत
पेट्रोलियम जेली किंवा लीप बाम मांड्यांना लावून तुम्ही जळजळ थांबवू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सैल कपडे घालण्याला प्राधान्य द्या. शक्य असेल तर सकाळी व रात्री मांड्यांना ताज्या कोरफडीचा गर लावू शकता