‘फादर्स डे’ (Father’s Day 2019)… आपल्या मराठीत सांगायचं तर पितृदिन! यंदा हा दिवस साजरा होतोय २० जून म्हणजेच आज. कारण दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे जगभर साजरा केला जातो. काहीजण या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात. आपल्या सगळ्यांच्याच यशाच्या मागे जशी आईची माया असते, तसेच ते यश आपल्याला मिळावं यासाठी खंबीर सूत्रधार म्हणून उभे असतात ते म्हणजे आपले बाबा. फादर्स डे साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करणं कोणाला नाही आवडणार? गेल्या दीड वर्षापासून देशात आणि जगभरात करोनाचं संकट उभं आहे. या पार्श्वभूमीवर इतर अनेक सण-उत्सवांप्रमाणेच यंदाही ‘फादर्स डे’ सर्वांनाच फादर्स डे सर्व नियम आणि कुटुंबीयांची काळजी घेऊन साजरा केला जात आहे. बरीच मुलं आपल्या वडिलांसाठी स्वतः फादर्स डे- कार्ड बनवतात, केक बनवतात, तर काही जण मस्त जेवणाचा बेत आखतात किंवा त्यांच्या वडिलांना त्यांच्या प्रेमाचे व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा