Father’s Day 2022 Wishes, Quotes, Greetings: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जाणार आहे. या खास दिनी आपल्याला वडलांना द्या खास शुभेच्छा. यासाठी घेऊन खास कोट्स,शुभेच्छा (Wishes, quotes in Marathi) मराठीतून…
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण, माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
हॅप्पी फादर्स डे!!!
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या
व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की,
तुमची साथ मला लाभली,
हॅप्पी फादर्स डे!!!

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य
हॅप्पी फादर्स डे!!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात
हॅप्पी फादर्स डे!!!

वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मी कधी बोलत नाही
सांगत नाही पण
बाबा तुम्ही
या जगाचे सर्वोत्तम बाबा आहा.
तुम्हाला हॅप्पी फादर्स डे!!!

देव स्वतः सगळ्याची काळजी करायला नाही येऊ शकत,
म्हणून त्यांनी वडिलांना या जगात पाठविले!
हॅप्पी फादर्स डे!!!
भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!!!
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
हॅप्पी फादर्स डे!!!
(मेसेज क्रेडीट: सोशल मीडिया)
आईसाठी तर आपण बरंच काही करत असतो, पण या पितृदिनी तुमच्या वडिलांना प्रेमपूर्वक संदेश पाठून त्यांना आनंदित नक्की करा.