उन्हाळ्याच्या सुट्टीला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बच्चे कंपनीलाही फिरायला जाण्याचे वेध लागले आहे. मात्र मुलांना दरवर्षी सुट्टीत कुठे फिरायला घेऊन जायचं हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. त्यावर उपाय म्हणून अनेक जण आपल्या मुलांना घेऊन परदेशवारीला जातात. मात्र प्रत्येक कुटुंबाला ही परदेशवारी जमेलच असं नाही. परंतु भारतातही अशी ठिकाणं आहेत जे अगदी कमी बजेटमध्ये देखील आपल्याला अविस्मरणीय अनुभव देऊ शकतात.
१. दार्जिलिंग –
पश्चिम बंगालमधील अत्यंत शांत आणि सुंदर असं ठिकाण म्हणजे दार्जिलिंग. निसर्गरम्य असलेलं हे ठिकाण चहासाठी देखील तितकंच प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे गेल्यावर चहाचे मळे हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. बर्फाने अच्छादलेले उंचच्या उंच पठारं आणि त्यातून जाणारी टॉय ट्रेन अनेकांचं मन मोहून घेते. दार्जिलिंगला पोहोचण्यासाठी रेल्वे वाहतूक आणि हवाई मार्ग असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
२. गंगटोक (सिक्कीम) –
भारतातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे गंगटोक. सिक्कीमची राजधानी असलेलं गंगटोक थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखलं जातं. येथील पर्वतरांगा, नदी पाहण्यासाठी पर्यटक खासकरुन याठिकाणी भेट द्यायला येतात. गंगटोकला मठांची भूमी असंही म्हटलं जातं. येथे हिमालयी जूलॉजिकल पार्क, चीन आणि भारताला जोडणारी नाथुला घाट, फ्लॉवर शो म्युझियम, गणेश टोक(मंदिर) हे पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.
३. चेरापुंजी –
अशिया खंडातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये चेरापुंजीचा समावेश करण्यात येतो. विशेष म्हणजे याची नोंद सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणूनही केलं जातं. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणं असून प्राचीन गुफा येथील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.
४. नैनिताल –
उत्तराखंड दोन प्रदेशांत विभागला आहे. गढवाल आणि कुमाऊ. कुमाऊतील ननिताल हे थंड हवेचे ठिकाण. प्रसिद्ध ननी तलाव आणि ननी मंदिरावरून हे नाव पडले. ननितालच्या सभोवती सात टेकडय़ा आहेत. ननिताल उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांसाठी एक सुप्रसिद्ध ठिकाण. येथील प्रेक्षणीय राजभवन सगळ्यासाठी खुले असते. येथील आर्यभट इन्स्टिटय़ूट खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. ननीदेवी मंदिर, मुक्तेश्वर मंदिर बघण्यासारखे आहे, स्नो व्ह्यू पॉइंटला केबल कार जाते.