Side Effect of Rusk: चहा पिणे प्रत्येकाला आवडते. अनेक लोक दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? खुशबू जैन टिब्रेवाला, पोषणतज्ञ आणि मधुमेह एजुकेटर, हेल्थ पॅंट्रीचे संस्थापक, यांनी सांगितले की, चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
चहा आणि टोस्टच्या सेवनाने कोणत्या समस्या वाढू शकतात?
चहा आणि टोस्टच्या सेवनाने रक्तातील साखर वाढते आणि शरीरात जळजळ होते. टोस्टचे सेवन केल्याने आतड्यात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. टिब्रेवाला यांनी indianexpress.com ला सांगितले की याचे सेवन केल्याने अपुरे पचन आणि पोषक तत्वांचे शोषण होत नाही आणि गरजेशिवाय फूड क्रेविंग वाढू लागते.
टोस्टच्या सेवनाने तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, हार्मोनल आरोग्यावर परिणाम होतो, चरबी आणि तणाव वाढतो आणि शरीरात सुस्ती येते. टोस्ट बनवण्यासाठी कोणते घटक वापरले जातात आणि ते आरोग्यासाठी कसे हानिकारक आहे हे तज्ञांकडून जाणून घेऊया..
मैदा
मैदा हा गव्हाच्या पिठाचा अत्यंत प्रक्रिया केलेला प्रकार आहे ज्यातून कोंडा, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढली जातात. त्यामुळे त्यात फायबर नसते. फायबरच्या कमतरतेमुळे ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.
साखर
साखरेमुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण वाढते. जर तुम्ही कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करत असाल तर टोस्टमध्ये असलेली साखर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते.
( हे ही वाचा: बदाम भिजवून खाल्याने खरोखरच फायदा होतो की ही केवळ अफवा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..)
रिफाइंड वनस्पती तेल
रिफाइंड वनस्पती तेल शरीराला कोणताही फायदा देत नाही. याचे कोणतेही पौष्टिक फायदे नसून शरीरात जळजळ वाढते.
रवा
रवा हा गव्हापासून बनवला जात असला तरी त्यात फायबर आणि कोणतेही पोषक घटक नसतात. टोस्ट दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात काही रसायन वापरले जाते जे आरोग्यास हानी पोहोचवू शकते.