सरळ आणि सिल्की केस कोणाला आवडत नाहीत? म्हणूनच स्ट्रेट केस नेहमीच ट्रेंडमध्ये राहिले आहेत. जसे भारतीय पोशाखांवर सरळ आणि मऊ केस शोभतात, तेवढेच ते पाश्चात्य पोशाखातही सुंदर दिसतात. म्हणूनच सर्व वयोगटातील मुली आणि महिला केस सरळ करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. केस सरळ करण्यासाठी सामान्यतः केमिकल उत्पादने आणि गरम साधने वापरली जातात, ज्यामुळे केसांना कायमचे नुकसान होऊ शकते.
केमिकलयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता नाहीशी होते आणि केसांची वाढही कमी होते. अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेऊया की तुम्ही नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुमचे केस कसे सरळ करू शकता. या घरगुती उपायांच्या मदतीने तुमचे केस खराब होणार नाहीत, उलट केसांनाच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया घरी नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करावे.
भारतातील ‘या’ शहरात सुरु झालं HIV Positive कामगार असणारं अनोखं कॅफे; आशियातील पहिलाच प्रयोग
या तीन गोष्टींचा वापर करून घरच्या घरी सरळ करा केस
मुलतानी माती :
केसांच्या पोषणासाठी मुलतानी मातीचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. केस सरळ करण्यासाठीही तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात ३ ते ४ चमचे मुलतानी माती घ्या, त्यात अंड्याचा पांढरा भाग आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घाला. आता फेटून याची बारीक पेस्ट बनवा. जर ते खूप घट्ट झाले असेल तर त्यात थोडे पाणी घाला जेणेकरून ते केसांना सहजपणे लावता येईल.
आता ही पेस्ट केसांना लावा आणि अर्धा तास राहू द्या. यानंतर हलक्या हाताने केस विंचरून पेस्ट पुन्हा लावा आणि पुन्हा केस विंचरा करा. नंतर केस धुवा. असे केल्याने तुमचे केस सरळ आणि मऊ होतील.
मध आणि स्ट्रॉबेरीचा वापर :
केस सरळ करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. हे करण्यासाठी, एक कप दुधात एक चमचा मध मिसळा आणि काही स्ट्रॉबेरी घाला. आता हे मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्या. आता ही पेस्ट केसांना नीट लावा. २ ते ३ तास राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. तुम्ही हे ३ ते ४ वेळा करा. असे केल्याने तुमचे केस हळूहळू नैसर्गिकरित्या सरळ होतील.
नारळाचे दूध आणि लिंबू :
केस सरळ करण्यासाठी तुम्ही नारळाचे दूध देखील वापरू शकता. यासाठी एक ग्लास नारळाचे दूध घेऊन त्यात अर्धा लिंबू पिळा. आता ते चांगले मिसळा आणि फ्रीजमध्ये ३ ते ४ तास ठेवा. जेव्हा मिश्रण थोडे घट्ट आणि मलईदार बनेल तेव्हा ते केसांना नीट लावा. यानंतर शॉवर कॅप लावून केसांना वाफ द्या. काही वेळाने केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. अनेकवेळा असे केल्याने तुमचे केस हळूहळू नैसर्गिकरित्या सरळ होतील.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)