तुमच्यापैकी अनेकांना मसालेदार, झणझणीत तिखट जेवण आवडत असेल, यासाठी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. पण हिरवी मिरची कापल्यानंतर अनेकदा हातांची जळजळ जळजळ होते. साबणाने हात धुतले तरी अनेक तास ही जळजळ कमी होण्याचे नाव घेत नाही अशावेळी काय करावे हेही सुचत नाही, यात चुकून तोच हात डोळ्यांना किंवा शरीराच्या इतर भागांवर लागला तर तिथेही आग होते. पण हिरवी मिरची चिरल्यानंतर हातांची जळजळ होऊ नये यासाठी खालील टिप्स नक्कीच फॉलो करु शकता.
हिरवी मिरची कापल्यानंतर हातांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
१) लगेच बर्फ लावा
हिरवी मिरची कापल्यानंतर लगेच हातावर बर्फाचा तुकडा चोळावा. याच्या मदतीने तुमच्या हातात जाणवणारी जळजळ बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
२) पीठ मळा
हिरवी मिरची कापल्यानंतर त्याच हाताने पीठही मळून घेऊ शकता. यामुळे ५ ते १० मिनिटे तुमचे हात कामात व्यस्त असतील, यामुळे तुम्हाला जळजळ कमी होण्यापासून खूप आराम मिळू शकतो.
३) एलोवेरा जेल लावा
मिरची कापल्यानंतर होणारी जळजळ दूर करण्यासाठी कोरफड वेरा जेल वापरणेही फायदेशीर ठरु शकते. एलोवेरा जेलने हातांना ५ ते ७ मिनिटे मसाज करा, यामुळे जळजळ कमी होईल.
४) खोबरेल तेल वापरा
खोबरेल तेलाचा वापर करुनही तुम्ही होणारी जळजळ कमी करु शकता. यासाठी मिरची कापल्यानंतर लगेच हाताला तेल लावा, ज्यामुळे हात जळजळणार नाहीत.
हिरव्या मिरच्या कापल्यानंतर त्याच हाताने शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नका. विशेषतः चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे. कारण चेहऱ्याची त्वचा फार संवेदनशील असले तिथे ही जळजळ तीव्रतेने जाणवते. तसेच हिरवी मिरची कापल्यानंतर लगेच हात चांगले धुवावेत.