Fenugreek Benefits: आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच वजन घटवण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करणं आवश्यक आहे. वजन घटवण्यासाठी उपयुक्त असलेले कित्येक पौष्टिक पदार्थ तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरामध्येही सहजरित्या आढळतील. ज्यांचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. यापैकीच एक रामबाण उपाय म्हणजे मेथीचे दाणे. मेथीच्या छोट्याशा दाण्यांमध्ये पोषण तत्त्वांची मात्रा भरपूर असते आणि यातील घटक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लाभदायक आहेत. आज आपण मेथीच्या दाण्यांच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.
मेथी आहे अत्यंत फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. मेथीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते. तसेच मेथीत रक्तातील साखर नियंत्रित करणारे एमिनो अॅसिडदेखील असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते. पचनप्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो आणि यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात दाण्यांमध्ये आढळणारे पोषक घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित स्वरुपात मर्यादित प्रमाणात मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे.
मेथीचा ‘असा’ करा वापर
- मेथीचे पाणी
एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. किंवा तुम्ही बिया पाण्यात उकळू शकता. ते गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.
- मेथीचा चहा
मेथीचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनी आणि आल्याचा तुकडा लागेल. एका पॅनमध्ये पाणी उकळा आणि त्यात तीनही घटक घाला. ते तयार करण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. हा चहा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
- मोड आलेले मेथीचे दाणे
तुम्ही मोड आलेल्या मेथीचेही सेवन करू शकता. यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे अंकुरलेले मेथीचे दाणे सकाळी खा. रिकाम्या पोटी किंवा जेवणादरम्यानही तुम्ही त्यांचे सेवन करू शकता.
- मेथी आणि मध
वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे आणि मधाची पेस्टदेखील खाऊ शकतो. यासाठी मेथीचे दाणे बारीक वाटून घ्यावेत. यानंतर त्यात मध मिसळून सेवन करा. याशिवाय तुम्ही ही मेथी पावडर पाण्यात उकळू शकता. यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून हर्बल टी म्हणून त्याचे सेवन करता येते. मधामध्येही अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, लोह आणि तांबे असते.