Fenugreek Seeds for Diabetes: मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि इतर रसायने असतात, ज्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे पचन कमी होऊ शकते. मेथीचे दाणे इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला रक्तातील साखरेवर नियंत्रण ( Sugar Control) ठेवायचे असेल तर आजच तुमच्या आहारात मेथीच्या दाण्यांचा (Fenugreek Seeds) समावेश करा. मेथीच्या दाण्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. मेथीचे दाणे अनेकदा स्वयंपाकात वापरले जातात हे तुम्ही पाहिलेच असेल. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला हा मसाला औषधांमध्येही वापरला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे.

आजच्या युगात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लोकांना अनेक आजार जडतात. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांवरही मेथी खूप गुणकारी आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी

(हे ही वाचा: Diabetes: बडीशेप मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान! ‘अशा’ प्रकारे करा वापर)

‘असा’ वापर करा वापर

  • मेथीचे दाणे पाण्यात टाकून १० ते १५ मिनिटे उकळावे. यानंतर, ते चहासारखे प्या. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
  • १०० ग्रॅम मेथी पावडरच्या डोसबाबत नुकतेच संशोधन करण्यात आले. या संशोधनात मधुमेही रुग्णांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात समान प्रमाणात मेथी पावडर देण्यात आली. २४ तासांनंतर मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल तपासले असता, दोघांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले.
  • दही आणि मेथी या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी कार्य करू शकतात. अशा स्थितीत एक कप दह्यात मेथी पावडर टाकून खा. याचा तुम्हाला फायदा होईल.
  • मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक केवळ मधुमेहाच्या समस्येवरच उपयुक्त नाहीत तर ते पचन आणि अॅसिडिटीच्या समस्येवरही परिणाम करतात. जर तुम्हालाही मेथीच्या सेवनाने या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर त्यासाठी दररोज १० ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजत ठेवा आणि त्याचे सेवन करा.

(हे ही वाचा: वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे)

(ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर लिहिली आहे. याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )