दिवाळीच्या फराळातील मानाचा पदार्थ म्हणजे करंजी. अनेक घरांमध्ये फराळाची सुरुवात गोड पदार्थापासून करण्या येते. यात बऱ्याचदा गृहिणी करंजी करण्यापासूनच फराळ करु लागतात. चवीला चविष्ट लागणारा हा पदार्थ करण्यासाठी देखील तितकाच किचकट आणि वेळ खाऊ आहे. यात अनेकदा करंज्यासाठी भिजवलेली कणिक सैल होते किंवा करंजी ऐनवेळी तेलात सोडताना फुटते. त्यामुळे करंजी फुटू नये यासाठी काही खास टीप्स जाणून घेऊयात.

साहित्य –
सुकं खोबरं
पिठीसाखर
खसखस
वेचली पावडर
दूध
तूप किंवा तेल

कृती –
सुक्या खोबऱ्याचा किस करुन ते खरपूर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर त्यात आवडीनुसार, पिठीसाखर घाला. तसंच अल्प प्रमाणात खसखस आणि वेलची पूड एकत्र करुन खोबऱ्याचा किस व पिठीसाखरेच्या मिश्रणात घाला. दुसरीकडे रवा व मैदा दोनास एक या प्रमाणात घेऊन ते व्यवस्थित मळून घ्या. मात्र, त्यापूर्वी या पीठात तुपाचं मोहन घाला. त्यानंतप पीठ मळून झाल्यावर दोन तास भिजवून ठेवा. गरज पडली तर त्यावर वजनदार वस्तू ठेवा. दोन तासानंतर पीठाच्या लहान लहान पुऱ्या करुन त्यात खोबरं-पिठीसाखरेचं सारण घाला व करंजी तयार करुन घ्या. नंतर तेल किंवा तूपावर गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या.

करंजी फुटू नये यासाठी खास टीप्स

१. रवा- मैदा कणिक भिजवल्यावर ती झाकून ठेवण्यापूर्वी त्यावर सुती कापड टाका.

२. तयार कणकेला भेगा पडू नये किंवा कणिक कडक होऊ नये यासाठी त्यावर तूपाचा हात लावा.

३. करंजा करताना सारण घातल्यावर पुरीच्या दोन्ही कडेला पाणी किंवा तूप लावा. त्यामुळे करंज्यांची दोन्ही टोकं जोडली जातात व करंजी फुटत नाही.

४. करंजी तळताना तिला सारखं हलवू नका. एका बाजूला रंग आल्यानंतर अलगद दुसरी बाजू पलटा.