आपण नेहमीच आजूबाजूला ऐकत आणि पाहत आलोय. नातं कोणतंही असूदेत त्या नात्यात थोडं तरी भांडण होत असतातच. बरेचदा इच्छा असू किंवा नसूनही पार्टनरसोबत भांडण होतात. नातं कितीही घट्ट असलं तरी वाद जे व्हायचे असतात ते होतातच. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमची तुमच्या पार्टनरसोबत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतात का? जर उत्तर होय असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं नातं कधीच तुटणार ही नाही आणि नात्यातला गोडवा कायम राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) जोडीदाराला वेळ द्या

जेव्हा आपण एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतो, तेव्हा आपण पूर्णपणे आपल्या पार्टनरच्या अवतीभवती असतोच. ही एक चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळा, नातेसंबंधात पार्टनरला वेळ न दिल्यामुळे तुम्ही जोडीदारासाठी एक बंधन बनू लागता. ज्यामुळे संबंध कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराला थोडा वेळ द्या, जेणेकरून तो त्याच्या मनातील गोष्टी ओळखू शकेल. असं केल्याने तुमचं नातं अधिक घट्ट होईल

२) काहीतरी नवीन करा

दररोज सारख्याच गोष्टी करून कोणीही कंटाळू शकतो, अशा स्थितीत नात्यात काहीतरी नवीन केल्याने कंटाळा दूर होतो आणि मजा येते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही क्षणांचा आनंद घेऊ शकता. नावीन्यपूर्ण करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेर फिरायला जा. बाहेर फिरायला गेल्यानंतर तुम्ही काही अविस्मरणीय आणि चांगल्या क्षणांचा आनंद घेऊनच घरी या. असे केल्याने नात्यात आनंद टिकून राहतो

३) गोष्टी शेअर करा

कधीकधी आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल बोलावं असं वाटतं. पण वर्तमानाचा विचार करून आपण गप्प राहतो. तसंच कधीकधी अनेकांना घरातल्या गोष्टी आणि पर्सनल गोष्टी या वेगवेगळ्या ठेवायला आवडतात. असं न करता तुम्ही तुमच्या जोडीदारासह सर्व गोष्टी शेअर करत जा. यामुळे तुमच्या नात्यावरील विश्वास वाढतो. तसंच, जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत काही शेअर करतो, तेव्हा एकमेकांच्या भावनांचा आदर करणेही महत्त्वाचे असते.

४) क्लालिटी टाईम द्या

चांगल्या नात्यासाठी हे आवश्यक आहे की नात्यातील दोन्ही व्यक्तींनी एकमेकांसाठी क्वालिटी टाईम देणं गरजेचं असतं. नात्याच्या सुरुवातीला दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात, परंतु जसजसे संबंध जुने होतात, तसतसा संवाद कमी होतो आणि भेटीगाठी सुद्धा हळूहळू कमी होतात. अशा परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवा.

५) जुन्या आठवणींना उजाळा देत जा

जुन्या आठवणी कितीही असो, त्या नेहमी चेहऱ्यावर हास्य आणतात. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदारासोबत बसा आणि जुन्या चांगल्या आठवणी आठवत त्यांच्याशी बोला. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम वाढते आणि तुमच्या जोडीदाराला कडू आठवणी पुसण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting your partner these 5 things will help maintain love in the relationship prp