Superfoods For Improve infertility: खराब आहार, बिघडलेली जीवनशैली आणि वाढता तणाव यामुळे महिलांना वंध्यत्वाचा त्रास सहन करावा लागत आहे. वंध्यत्व ही अशीच एक समस्या आहे जी महिलांना खूप त्रास देते. ओव्हुलेशन डिसऑर्डर, फॅलोपियन ट्यूब खराब होणे, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशय किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्या, महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या अशा अनेक कारणांमुळे येते. वंध्यत्वाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही पदार्थ औषधासारखे काम करतात.

हार्वर्डचे संशोधक टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की आहारामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी काही सुपरफूड्सबद्दल माहिती दिली आहे. या सुपरफूडचे सेवन केल्याने प्रजनन क्षमता सुधारते आणि शरीर निरोगी राहते. महिलांमधील वंध्यत्व दूर करण्यासाठी कोणते सुपरफूड फायदेशीर आहेत हे जाणून घेऊया तज्ञांकडून..

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

अंजीर स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारते (Figs improve fertility)

अंजीर हे एक ड्राय फ्रूट आहे जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडस्, लोह आणि फिनॉल सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. या ड्रायफ्रूटचे सेवन केल्याने वंध्यत्व सुधारते आणि शरीर निरोगी राहते. अंजीर हे सुपरफूड वंध्यत्व सुधारण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही सेवन करू शकतात.

डाळिंबाने प्रजनन क्षमता सुधारा (Improve infertility with pomegranate)

डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. डाळिंबाचे सेवन केल्याने वंध्यत्व दूर होऊ शकते.

( हे ही वाचा: जिभेवर दिसणाऱ्या ‘या’ खुणा देतात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत; वेळीच जाणून घ्या)

काजू प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी प्रभावी आहे (Improve infertility with pomegranate)

रिसर्चनुसार तज्ज्ञ लवनीत बत्रा म्हणाले की, काजूमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते. जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही रोज काजूचे सेवन करावे.

दालचिनी प्रजनन क्षमता सुधारते (Effect of Cinnamon on fertility)

दालचिनी हा एक असा मसाला आहे जो औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हा मसाला प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आढळतो. या मसाल्याचा वापर अन्नात, तसेच औषधांच्या स्वरूपात केला जातो. याचे सेवन केल्याने महिला आणि पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.

गाईचे दूध प्या (Drink Cow’s Milk)

महिलांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गाईच्या दुधाचे सेवन करावे. गाईच्या दुधात सॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते. त्यात असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन के २ सारख्या फॅट विरघळणारे जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Story img Loader