Find Out How Much Gas Is Left In LPG Cylinder : एलपीजी सिलेंडर आपल्याला घरोघरी दिसते. या सिलेंडरमुळे जेवण बनविणे अधिक सोयीस्कर झाले, पण सिलेंडरमध्ये गरजेनुसार गॅस भरावा लागतो. अनेकदा अंदाज नसल्यामुळे सिलेंडरमधील गॅस संपतो आणि वेळेवर गॅस भरून आणण्यासाठी धावपळ करावी लागते. पण, तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की गॅस संपणार आहे.

ओल्या टॉवेलचा करा उपयोग

  • सिलेंडरमधील गॅस लेव्हल तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घ्या आणि सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. यामुळे सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यानंतर टॉवेल बाजूला काढा आणि चेक करा की सिलेंडरचा कोणता भाग लवकर वाळत आहे आणि कोणता भाग जास्त वेळ ओला आहे?

हेही वाचा : Proteins Food : श्रावणात नॉनव्हेज खाऊ शकत नाही? डाळीबरोबर खा ‘या’ तीन गोष्टी, चिकन-मटणपेक्षाही जास्त मिळेल प्रोटीन्स

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
  • गॅस लेव्हल तपासण्यासाठी सिलेंडरचा ओला आणि कोरडा भाग नीट तपासा. जो भाग ओला आहे त्या भागात गॅस आहे असे समजावे, तर जो भाग कोरडा आहे त्या भागातला गॅस संपला आहे असे समजावे.
  • सिलेंडरमध्ये एलपीजी (LPG) असते. या गॅसमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. अशात सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही; पण ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader