आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतांश लोकांना बीपीचा आजार असतो. अयोग्य खाण्यापिण्यामुळे तसेच जास्त ताण घेतल्याने ही समस्या उद्भवते. रक्तदाब असणाऱ्यांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. या लोकांनी आपल्या आहारात पोटॅशियम युक्त आहाराचा समावेश करावा. जेणेकरून त्यांचे बीपी नियंत्रणात राहील. तसेच, त्यांनी त्यांच्या जेवणातील मिठाचे प्रमाण पूर्णपणे कमी केले पाहिजे. दरम्यान, या रुग्णांनी चहा टाळावा की नाही हे देखील जाणून घेऊया.
चहा पिणे योग्य की अयोग्य?
- तज्ञांच्या मते, चहा प्यायल्याने रक्तदाब वाढत नाही, परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना इतरही समस्या आहेत, अशा लोकांनी उच्च रक्तदाबात चहा पिऊ नये.
- उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास असेल तर त्यांनी चहा अजिबात पिऊ नये.
कडक उन्हापासून वाचण्यासाठी तुम्हीही वापरत आहात स्वस्तातले गॉगल्स? जाणून घ्या याचे दुष्परिणाम
- उच्च रक्तदाब असलेल्यांना चिंता, तणाव असल्यास चहा पिऊ नये. त्यांनी चहा प्यायल्यास बीपी वाढण्याची शक्यता असते.
- उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना लघवी करताना जळजळ होत असेल तर त्यांनी चहा टाळावा. जास्त चहा प्यायल्याने छाती आणि पोटात जळजळ होते.
- असे तर, कोणत्याही व्यक्तीने रिकाम्या पोटी चहा पिऊ नये, परंतु रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याची पातळी वाढू शकते. या स्थितीत छातीत जळजळ होऊ शकते.
या उपायांनी रक्तदाब नियंत्रित करा
- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कॅफिनचे प्रमाण जास्त झाल्यास बीपीच्या रुग्णांना हानी पोहोचते.
- रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात मीठ आणि सोडियमचे प्रमाण कमी ठेवावे. मीठ आणि सोडियमच्या अतिरेकीमुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो. मीठ कमी प्रमाणात खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो.
- चिप्स, लोणचे इत्यादी पॅक केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ते टाळावे.
- धूम्रपान, मद्यपान टाळा. ते आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
- बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राणायाम, योगासने आणि व्यायाम यांचा जीवनशैलीत समावेश करणे आवश्यक आहे.
- सामान्यत: रक्तदाब १२०/८०MMHg असावा. रक्तदाब वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, डोकेदुखी व छातीत दुखणे असे प्रकार होतात.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांशी संपर्क साधा.)