एखाद्या निराश व नकारात्मक व्यक्तिच्या ग्रंथींमधून येणाऱ्या घामाच्या एका साध्य़ाशा चाचणीमधून त्या व्यक्तिमध्ये आत्महत्येचा कल किती आहे हे ९७ टक्के अचूक समजू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
जर्मन आणि स्विडिश संशोधकांनी रक्तदाब, रक्ताचे अभिसरण आणि हाताच्या बोटांच्या घामाच्या ग्रंथींचे कार्य यावरून एखादी व्यक्ती आत्महत्या करण्याकडे किती कलली आहे हे कळू शकते असा दावा केला आहे.
“हा खूप मोठा शोध आहे. मला या गोष्टीचे खूपच आश्चर्य वाटते. आपण एखाद्या व्यक्तिचा आत्महत्या करण्याचा कल बऱ्याच प्रमाणात बरोबर ओळखू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तिला आत्महत्येपासून परावृत्त करता येऊ शकते,” असे यावर संशोधन करणारे स्विडनच्या लिंकोपील विद्यापीठाच्या प्रायोगिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लार्स-हाकन थोरेल यांनी सांगितले.
या अभ्यासांतर्गत मानसोपचारशास्त्रज्ञांनी जर्मनी मधील ७८३ निराशाग्रस्तांवर काही चाचण्या घेतल्या. वातावरणातील बदलाबरोबर आत्महत्येकडे कललेल्या व्यक्तीच्या वागण्यात देखील विचित्रपणा  जाणवत होता.  
अभ्यासा दरम्यान निराशेने ग्रासलेल्या व्यक्तिंच्या वागण्यामध्ये ९७ टक्के विचित्रपणा जाणवत होता. त्या लोकांनी नंतर च्या काळामध्ये आत्महत्या केल्या. केवळ निराशेने ग्रासलेले दोन टक्केच लोक विचित्रपणे वागत नव्हते.
अभ्यासादरम्यान या सर्वांच्या बोटांना सेन्सर लावून त्यांच्या शरीराच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या.     

Story img Loader