हृदयविकाराने त्रस्त असलेल्या फ्रान्स येथील एका ७५ वर्षीय रूग्णावर नुकतेच कृत्रिम हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या हृदयप्रत्यरोपण शस्त्रक्रीयेमुळे या रूग्णाच्या आयुष्यामध्ये पाच वर्षांची भर पडली अल्याचा दावा संबंधीत डॉक्टरांनी केला आहे. ‘कार्मट’ या फ्रेंच जीववैद्यकीय संस्थेने हे कृत्रिम हृदय तयार केले असून, लिथियम-आयन विद्युत घटकांमार्फत या हृदयाला उर्जा पुरवण्यातआली आहे.
पॅरीस येथील जॉर्जस पॉम्पिडोउ रूग्णालयामध्ये हृदयप्रत्यरोपणाची ही शस्त्रक्रीया करण्यात आली असल्याचे ‘द टेलिग्राफ’ने म्हटले आहे.
या कृत्रिम हृदयामुळे या रूग्णाचे आयुष्य पाच वर्षांपर्यत वाढले असल्याचे सांगण्यात आले आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी रूग्ण शुध्दीवर आला असून, तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले. कृत्रिम हृदयप्रत्यारोपणाची ही पहिलीच वेळ असून, पुढे हे संशोधन अधिक विकसीत होणार असल्याचे ‘कार्मट’चे मार्सेलो कॉन्व्हीटी यानी सांगितले.           

Story img Loader