Things Do After Spa: पार्लरमध्ये जाऊन स्पा घेणे हा असा उपचार आहे ज्याच्या मदतीने शरीराला आराम मिळतो. स्पा उपचार करून शरीर पुन्हा सक्रिय होते. आजकाल हे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि अनेक महिला स्पा करून घेतात. बॉडी स्पा करण्यासाठीही खूप पैसा खर्च होतो. पण तुम्हाला दर आठवड्याला स्पा करणे शक्य नसते. काही लोक बॉडी स्पा घेतल्यानंतर काही चुका करतात, ज्यामुळे त्यांची सर्व मेहनत, वेळ, पैसा वाया जातो आणि शरीराला कोणताही फायदा होत नाही. अशा परिस्थितीत, स्पा करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊ या…

स्पा उपचारानंतर या गोष्टी लक्षात घ्या-


१. स्वतःला रिलॅक्स करा
जर तुम्ही स्पा ट्रीटमेंट करून घेत असाल तर त्या वेळी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. म्हणजेच स्पा करताना मनावर ताण देऊ नका. आपल्यापैकी बहुतेकजण स्पा दरम्यान आपले मन शांत न ठेवण्याची चूक करतात. हे करू नका. तुम्ही स्वतःला थेरपिस्टच्या स्वाधीन करा आणि रिलॅक्स व्हा.

हेही वाचा – गुलाबपाण्याच्या आइस क्यूब्सने करा चेहऱ्याला मसाज; त्वचेवर येईल तेज!

२.थेरपिस्टच्या मार्गदर्शक सुचनांकडे लक्ष द्या
खूप स्पा लोक करणाऱ्या थेरपिस्टच्या मार्गदर्शक सुचनांकडे लक्ष देत नाही. जर स्पा करताना तुम्हाला तुमच्या शरीरावर जास्त दबाव जाणवत असेल त्यांना ते कमी करण्यास सांगा. त्यामुळे तुमचे शरीराची योग्य मालिश होईल. असे करण्यास अनेक लोक संकोच करतात पण तुम्ही बिनधास्तपणे थेरपिस्टबरोबर संवाद साधा. नंतर शरीराला कोणतेही दुखापत जाणवू नये यासाठी स्पा घेताना या गोष्टीची काळजी घ्या.

हेही वाचा – फाटलेले जुने पडदे फेकून देताय? पैसे वाचवायचे असतील तर ‘असा’ करा त्याचा पुन्हा वापरा, जाणून घ्या सोप्या टिप्स

३.मालिश केल्यानंतर विश्रांती घ्या
जेव्हाही तुम्ही पार्लरमधून स्पा ट्रीटमेंट कराल तेव्हा लक्षात ठेवा की घरी आल्यानंतर काही तास विश्रांती द्या. कारण मसाज केल्यावर लगेच तुम्हाला कोणतेही जड काम करू नये. विश्रांती घेतल्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्हीला आराम मिळेल. मसाज केल्यानंतर तुम्ही १ ते २ तास झोपा.

Story img Loader