नियमित व्यायाम केल्याने तारुण्य राखण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे, माशाच्या तेलाचे सेवन करणा-या व्यक्तीचे तारुण्यही अधिक काळ टिकू शकते. माशाच्या तेलामुळे व्यक्तिच्या मांसपेशींमध्ये नव्याने ताकद येते आणि परिणामी त्यामुळे त्वचा सतेज राहते, असे एका संशोधनात आढळले आहे. मात्र, हे तेल पूर्णपणे सौंदर्यवर्धक असल्याचे स्पष्ट करण्यासाठी सखोल संशोधनाची आवश्यकता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
माशाच्या तेलात असणारे ओमेगा-३ मेदाम्ल हृदयासाठी विशेष फायदेशीर आहे. वृद्धावस्थेत व्यक्तीच्या शरीरातील मांसपेशी आकुंचन पावतात परिणामी त्वचेवर सुरकुत्या पडतात. तसेच गुडघेदुखी, चालताना पायात होणार्‍या वेदना यांना देखील मांसपेशींचे आकुंचन हेच कारणीभूत असते. या मेदाम्लांचा उपयोग वजन कमी करण्यासाठीदेखील होतो. जंक फूडमध्ये असणारी साखर व संपृक्त मेद यामुळे वजन वाढते. चयापचयाच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. मेंदूचे आरोग्यही बिघडते. यात मेंदूची नवीन चेतापेशी तयार करण्याची प्रक्रिया मंदावते, त्याचा संबंध लठ्ठपणाशी असतो. ओमेगा-३ मेदाम्लांमुळे हे दुष्परिणाम टाळले जातात. जंकफूड सेवन केल्यानंतर शरीरातून मेंदूचे संरक्षण करणारी जी संप्रेरके स्रवतात ती मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत.

Story img Loader