आहारातील चुकीच्या सवयीमुळे आपल्यापैकी बहुतेकांमध्ये पचनाशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. असे मानले जाते की शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी योग्य पचन सर्वात महत्वाचे आहे. पचनाच्या समस्येमुळे लोकांना अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही पचनाच्या समस्येने चिंतेत असाल तर आयुर्वेदात सांगितलेले उपाय वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.
आयुर्वेद ही सर्वात प्राचीन वैद्यकीय प्रणालींपैकी एक आहे. आयुर्वेदानुसार, चांगले पचन आणि पोटाच्या समस्या टाळण्यासाठी ‘अग्नी’ संतुलित करणे महत्वाचे आहे. मानवी शरीरात होणार्या सर्व पाचन आणि चयापचय प्रक्रियांसाठी अग्नी जबाबदार असल्याचे मानले जाते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमचे पाचक आरोग्य सुधारायचे असेल, तर अग्नीची काळजी घ्या. पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ या समतोल राखण्यासाठीच्या उपायांबद्दल.
बडीशेप
पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी एका बडीशेपचे सेवन फायदेशीर मानले जाते. हे भूक सुधारते आणि पोटशूळ कमी करते. ज्यांना पोटात जळजळ होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
मेथी
आयुर्वेदानुसार ज्यांना पोटाची समस्या आहे त्यांनी मेथीचे सेवन करावे. मेथी फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत मानली जाते, जी पोट निरोगी ठेवण्यास मदत करते. शरीरातील सर्व अवांछित आणि हानिकारक विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठीही मेथीचे सेवन फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे देखील वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
आणखी वाचा : क्रिस्टल कासव ठेवल्याने मिळते अफाट संपत्ती; घरात किंवा ऑफिसमध्ये असे ठेवा
आले
आले पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकतं. आल्यामध्ये वेदना कमी करणाऱ्या रासायनिक संयुगांसह शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते. मसाला म्हणून किंवा चहामध्ये आले घालून सेवन करणे पोटासाठी फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदात आलं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर औषध असल्याचे सांगितले आहे.
(टीप: हा लेख वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.)